*पुण्यात बार्बेक्यू नेशनने सादर केले ‘रॉयल किचन्स ऑफ इंडिया’…*

पुणे, news24live : भारतातील अग्रगण्य उपहारगृहांच्या साखळीतील एक असलेल्या बार्बेक्यू नेशनने पूर्वीच्या काळातील भारतीय संस्थानांचे खाद्यपदार्थ पुण्यात आणले आहेत. राजेशाही मुदपाकखान्यात काम केलेल्या आचाऱ्यांच्या अनेक पाककृती पिढ्यान्-पिढ्यात संक्रमित झाल्या आहेत. पुण्यातील कल्याणी नगर, डेक्कन, वाकड, ऍमनोरा मॉल व पिंपरी-चिंचवड येथील खवय्यांना या स्वादिष्ट पदार्थांचा १५ नोव्हेंबरपासून ३ डिसेंबरपर्यंत आस्वाद घेता येणार आहे.
Multani Paneer
या खाद्यमहोत्सवात काश्मीर आणि पंजाबसारख्या उत्तरेकडील राज्यांपासून आंध्रप्रदेश व केरळ सारख्या दक्षिणेकडील राज्यांमधील खाद्यपदार्थांचा खाद्यप्रेमींना आस्वाद घेता येईल व या माध्यमातून त्यांना खाद्यपदार्थांचा इतिहासही जाणून घेता येईल.
मशरुम लाजवाब-मशरुम, काळीमिरी, आलं-लसूण आणि इतर रुचकर मसाल्यांचा वापर करून तयार केलेला मशरूमचा चवदार पदार्थ, मेवा शाही कबाब आणि दही के कबाब: बडीशेपच्या चटणीबरोबर गरमागरम वाढण्यात येणार अवधी दहीवडे अशा शाकाहारी स्टार्टर्सचा खाद्यप्रेमींना आस्वाद घेता येईल. तर मांसाहारी खवय्यांसाठी अनारी मूर्ग तंगडी, डाळींबाच्या बिया आणि चीझचे सारण भरलेले चिकनचे तुकडे जे आलं-लसणाच्या मिश्रणात खारवलेले असतात; अजवाईन फिश टिक्का- दही आणि मसाल्यांच्या मिश्रणात खारवलेले आणि ओव्याच्या रसात बुडवलेले माशाचे तुकडे आणि काश्मीरची पारंपरिक पाककृती असलेली तुजी चिकन हे पदार्थ उपलब्ध आहेत. एलूकेरी- भाजलेल्या खोबऱ्याची आणि तीळाची मसालेदार चव असलेली कढी ज्यात चिंच आणि गुळामुळे आंबट गोड अशा विभिन्न चवी येतात; झेर्सामनी पनीर- रामपूरच्या शाही मुदपाकखान्यातील पनीरची एक खास पाककृती. तेलिया माह- हिमाचलची एक मसालेदार ताकाची कढी, जो शाकाहारी जेवणातील पदार्थ आहे. मछली जैसमंद- हिरव्या वाटणात खारवलेले कोवळ्या माशांचे तुकडे जे तोंडाला पाणी आणणाऱ्या मसाल्यांमध्ये शिजवलेले असतात. पद्मापूरी मूर्ग- खोया, तूप आणि सुवासिक मसाल्यांचा वापर करुन बनवलेली राजस्थानच्या वाळवंटातील एक शाही चिकनची पाककृती आणि अवधी मूर्ग बिर्याणी जिचा मांसाहारी गिऱ्हाईक आस्वाद घेऊ शकतात.
Aloo Bukhara
जेवणाचा शेवट गोड व्हावा म्हणून गुड और बादाम की फिरनी हा तांदळापासून बनवलेला मलाईदार गोड पदार्थ ज्यात गुळ आणि बदाम वापरलेले असते, अदरक का हलवा, मैसूर पाक – गुळ मैसूर पाक म्हणून ओळखला जाणारा तूप, साखर, बेसन आणि वेलची पासून बनवलेला पदार्थ आणि बार्बेक्यूची खासियत असलेला बनाना कॅरेमल केक आणि कुल्फीच्या विविध प्रकारांसारख्या इतर डेझर्ट्सचा अतिथी आस्वाद घेऊ शकतात. या यादीत भर म्हणून पानप्रेमींसाठी मसाला मीठा पान देखील उपलब्ध आहे. बार्बेक्यू नेशन हॉस्पिटलिटी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. समीर भसीन म्हणतात, “उत्सवाच्या नावाप्रमाणेच, आमच्या ग्राहकांना राजेशाही खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याची आणि अनुभवाची संधी प्राप्त करुन देणे हा या उत्सवाचा हेतू आहे. या खाद्यमहोत्सवाच्या माध्यमातून आम्ही आमच्या ग्राहकांना आपल्या स्वयंपाकाच्या वारशाचा अनुभव घेण्याची संधी देऊ इच्छितो. आम्हाला खात्री आहे की पुण्यातील  खाद्यप्रमींचा या खाद्यसफरीला उत्तम प्रतिसाद मिळेल.”
Awadhi Murgh Biryani
ठिकाण:-  बार्बेक्यू नेशन कल्याणी नगर (आगा खान पॅलेसच्या मागे)
              बार्बेक्यू नेशन डेक्कन (आर डेक्कन मॉल)
              बार्बेक्यू नेशन वाकड (सयाजी हॉटेल) 
              बार्बेक्यू नेशन ऍमनोरा (ऍमनोरा मॉल)
              बार्बेक्यू नेशन पीसीएमसी (पिंपरी-चिंचवड परिसर)
कालावधी- १५ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर २०१७
दोघांच्या जेवणाचा सरासरी खर्च: रु.१६००/-
वेळ- संध्यकाळी ७:३० वाजता 
संपर्क- १८००१०८६०६०
Dal Maharani
बार्बेक्यू नेशनबद्दल:
बार्बेक्यू नेशन हे डीआयवाय (डू इट युवरसेल्फ) या संकल्पनेचे भारतातील उद्गाते आहेत. मुंबईत २००६ साली त्याचे पहिले स्टोअर सुरू झाले आणि ऑन-द- टेबल ग्रिल ही संकल्पना या ठिकाणी प्रथम राबविण्यात आली. माफक दरांत ग्राहकांना संपूर्ण जेवणाचा अनुभव देणे उद्दिष्टाने बार्बेक्यू नेशनची स्थापना करण्यात आली. ही तत्त्वे सर्व सेवांमध्ये अंगीकारल्यामुळे ही खानपानसाखळी वेगाने विस्तारली. २००८ पर्यंत चंदीगड, दिल्ली एनसीआर, उत्तरप्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूमध्ये शाखा पसरुन बार्बेक्यू साखळीने भारतभर अस्तित्व प्रस्थापित केले . आपण देत असलेल्या मोबदल्यात मिळणाऱ्या दर्जाबाबत काटेकोर असणाऱ्या ग्राहकांमध्ये बार्बेक्यू नेशन लोकप्रिय झाले. २०१५ साली बार्बेक्यू नेशन 'ने त्यांच्या शाखांमध्ये लाइव्ह काउंटर्सची सुरुवात केली. या काउंटर्सवर आचारी ग्राहकांच्या मागणीनुसार पदार्थ तयार करून देतो. नेहमी ग्राहकांना प्रथम प्राधान्य देण्याच्या तत्त्वाला अनुसरुन उपहारगृहांची ही साखळी त्यांच्या शाखांमध्ये
सतत नावीन्यपूर्ण खाद्य-महोत्सव भरवून त्यांच्या ग्राहकांना अनेक प्रकारचे मनोरंजक पदार्थ सादर करत असते. त्यांपैकीच एक भाग म्हणजे बॉलीवूड बार्बेक्यूज फूड फेस्टिवल. आज बार्बेक्यू नेशनच्या भारतात ८६ हून अधिक शाखा आहेत आणि बार्बेक्यू नेशनची जादू कशी पसरवता येईल, यावर त्यांचे लक्ष आहे.
news24live
#update_urself