*४३५ कर्णबधीर मुलांचा बिग इअर्सच्या मदतीने आवाजाच्या जगात प्रवेश… ग्रॅज्यूएटींग सोहळ्याला विक्रम गोखले मुख्य अतिथी म्हणून उपस्थित*

पुणे, news24liveजन्मतःच मुकबधीर असणाऱ्या मुलांसाठी कॉकलीयर इम्प्लांट शस्त्रक्रिया केली जाते ज्याने कधीही आवाजाचा स्पर्श न झालेल्या मुलांना ऐकायला येऊ लागते. ह्याने ते सहज शांतता, अपंगत्वावर मात करून एक स्वावलंबी जीवन जगू शकतात. बिग इअर्सच्या मदतीने १२ वर्षात सुमारे ४३५ मुलांना ह्याचा लाभ घेता आला आहे. अशाच मुलांसाठी बिग इअर्स ग्रॅज्यूएटींग सेरेमनी साजरी करते. यशस्वीरीत्या पार पडलेल्या शस्त्रक्रियेचा आनंद साजरा करता यावा आणि मुलांना एक प्रेमाची, काळजीची थाप देता यावी ह्यासाठी बिग इअर्स हा अनोखा आणि भावनिक कार्यक्रम आयोजित करतात. शुक्रवारी, ९ मार्चला हा सोहळा रिगल हॉल, शेरेटन ग्रँडला मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा झाला. नाटक आणि सिनेमा क्षेत्रातील मोठे व्यक्तिमत्व विक्रम गोखले यांच्या हस्ते मुलांना त्यांची ग्रॅज्यूएशन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आली. ह्यावेळी ५७ मुलांना अभिनेता विक्रम गोखले यांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. ह्या प्रसंगी  डॉ. नीलम वैद, इम्प्लांटिंग सर्जन प्रमुखतहा उपस्थित होत्या

VIDEO LINK :

https://www.facebook.com/nextnarad/videos/1589992357735742/

कित्येक वर्षांच्या पुनर्वसन, उपचार आणि प्रशिक्षणानंतर ही मुले एक सर्वसामान्य आयुष्य जगू शकतात. ह्या विलक्षण सोहळ्याला अनेक लोक उपस्थित होते. बिग इअर्स मुलांना ऐकायला, बोलायला आणि एक उत्तम भविष्य मिळवून देण्यासाठी कार्य करते. बिग इअर्स हे पुण्यातील एकमेव कॉकलीयर इम्प्लांट सेंटर असून  कॉकलीयर संबंधी सर्व सोयी येथे उपलब्ध आहेत.

 MVIMG_20180309_165533

२०१२-२०१३ च्या दरम्यान ह्या ग्रॅजूएट होणाऱ्या मुलांना त्यांचे इम्प्लांट्स मिळाले होते. या मुलांच्या आयुष्यात  सूर मिळण्यासाठी 

सर्जन, ऑडिओलॉजिस्ट्स, भाषण आणि भाषा चिकित्सक, सल्लागार ही बिग इअर्सची टीम पालकांच्या मदतीने काम करते. यात मुख्यत: अंडरप्रीवीलेज्ड मुलांचा सहभाग असतो. १२ वर्षात ४३५ यशस्वी कॉकलीयर शस्त्रक्रिया बिग इअर्स करतात.

 

आपले मुल हे कोणापेक्षाही कमी नसून एक दिवस तेही सर्वसामान्य मुलांप्रमाणे एक सामान्य जीवन जगू शकेल असा विश्वास आणि स्वप्न कित्येक पालकांचे असते. अशा पालकांना त्यांचे स्वप्न पूर्णत्वास आणण्यासाठी बिग इअर्स अथक परिश्रम करते. बिग इअर्स सर्व पालकांना उत्तमोत्तम सल्ला आणि चिकित्सा देण्याचा प्रयत्न करतात, ९८% लोक ही महागडी उपकरणे आणि सेवांचा लाभ आर्थिक अडचणींमुळे घेऊ शकत नाही. गेली १२ वर्षे बिग इअर्सने त्यांना आर्थिक मदत मिळवून देवून योग्य ती सेवा उपलब्ध करून दिली आहे.

 

बिग इअर्सच्या मुलांनी आपल्याला मिळालेली मदत, आधार आणि वेळ ज्यामुळे ते आज एक सर्वसामान्य आयुष्य जगू शकतात, ज्यामुळे ते शांततेवर मात करत सुरांचे आयुष्य जगू शकतात;  ह्याप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी एक अनोख्या डान्स पर्फोर्मंसचे आयोजन केले होते.“आवाज आला” ह्या डॉक्युमेंटरीलादेखील यावेळेस दाखविण्यात आले. ४ इम्प्लांटेड मुलांची ही एक प्रेरणादायी कथा आहे.

news24live

#update_urself