*अत्याधुनिक सुविधांसह सिल्व्हर बेसिस ग्रुपचा भारतात चाकण येथे विस्तार.*

news24live : सिल्व्हर बेसिस हे ऑटोमोटिव्ह इंजेक्शन टूलींगमधील जगातील आघाडीचे नाव असून चाकण, पुणे येथे ते आपल्या नवीन अत्याधुनिक सुविधा सुरु करणार आहेत. याची घोषणा नुकतीच करण्यात आली. ऑटोमोटिव्ह मार्केटमधील मध्यम आणि मोठ्या आकाराच्या इंजेक्शन टूल्सकरिता ही सेवा उपयुक्त असणार असून स्थानिक आणि निर्यात गरजांसाठी याचा फायदा होईल. चीनबाहेर प्रथमच ते नवी साधनांची निर्मिती भारतात करणार आहेत. 

ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीतील आघाडीची कंपनी फॉरेशिया आणि पुण्यातील इंजेक्शन मोल्ड मेकिंग कंपनी क्राफ्ट्समन टूलींग यांच्या सहयोगाने बेसिस मोल्ड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही नवीन कंपनी स्थापन करण्यात आली आहे. सिल्व्हर बेसिस बेसिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे बहुसंख्य भागधारक असून ते कंपनीचे व्यवस्थापन बघतील. 

सिल्व्हर बेसिसच्या गेल्या २५ वर्षाच्या कार्यकाळातील बेसिस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड हे एक माईलस्टोन आहे असे मत सिल्व्हर बेसिसचे इव्हीपी रायन हॉंग ह्यांनी व्यक्त केले. आमच्या महत्वाच्या दीर्घकालीन ग्राहकांशी आम्ही भागीदारी केली असून आमचे संबंध अधिक घट्ट करून भारतातील आणि भारताबाहेरील ऑटोमोटिव्ह मार्केटला उत्तमोत्तम टूल्स देण्याचा आमचा मानस आहे असेही ते म्हणाले.

सध्या भारतात ८० ते ९० टक्के मोल्ड्स आयात केले जात असुन त्याने भारतीय बाजारपेठेची १० ते १२ टक्क्याने वार्षिक वाढ होत आहे. कपंनीने नुकतीच ५० करोडची गुंतवणूक केली असुन पुढिल ३ ते ५  वर्षात १२० मोल्ड्सच्या निर्मीतीद्वारा  दरवर्षी  उत्पादन दुप्पट करण्याचा कंपनीचा मानस आहे, तसेच पुढिल ३ वर्षात ७० कोटी करंट रेव्हेन्यूचे ध्येय आहे. 

भारतीय बाजारपेठेची वाढ अतिशय वेगाने होत असून ५० टक्के निर्यातीचे उद्दिष्ट आहे. सध्या आमच्याकडे ८० कर्मचारीवर्ग असुन पुढिल २ ते ५ वर्षात त्यात मोठ्या संख्येने वाढ करण्याचा मानस आहे. 

#news24live

#update_urself