*करिष्मा कपूर यांच्या हस्ते लोकप्रिय नीरूज्‌ स्टोअर चे उदघाटन*

news24live :

हैदराबाद आणि मुंबईमध्ये उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर लोकप्रिय एथनिक ब्रॅन्ड नीरूज्‌ने पुणे शहरात आपल्या पहिल्या स्टोअर ची सुरूवात सेलेब्रिटी उद्‌घाटक करिष्मा कपूरच्या हस्ते फिनिक्स मार्केट सिटी, विमान नगर येथे केली.

 IMG_20180511_133857

ह्या स्टोअरने ह्या सीझनमधील आकर्षक एथनिक वेअरट्रेंड्‌स दाखवले. ह्या लाँचच्या वेळेस नीरूज्‌ चे व्यवस्थापकीय संचालक श्री. अवनिश कुमार उपस्थित होते. नीरूज्‌ ह्या ब्रॅन्डने भारत भरात एथनिक फॅशनवेअरमधील नवीन उंची प्रस्थापित केली आहे. येथे प्रत्येक पोशाख हा सर्वोत्तम गुणवत्ता, उत्तम डिजाईन्स,शुद्ध फॅब्रिक्स, उजळ रंग, छान टेलरिंग आणि अभिनव आकार यांना लक्षात घेऊन बनवण्यात येतात.

 IMG_20180511_135436

नीरूज्‌चे व्यवस्थापकीय संचालक श्री. अवनिश कुमार म्हणाले, “फिनिक्स मार्केट सिटी, विमान नगर, पुणे येथे नीरूज्‌च्या सुरूवातीची घोषणा करताना आम्हांला अतिशय आनंद होत आहे. येथे आमचे २००० चौरस फूट क्षेत्रफळाचे स्टोअर असून ते आमच्या उपब्रॅन्ड्‌ससाठीही शॉप-इन-शॉप सारखे असेल. आमच्याकडे मिक्स अॅन्डमॅचची श्रेणी आणि लहान मुलांसाठी लिटल नीरूज्‌ आहे.”

 Must Watch KARISHMA KAPOOR’S Exclusive interview & Share with ur friends and family…

You Tube Link : 

नीरूज्‌ बद्दल माहिती :

नीरूज्‌ची सुरूवात १९७१ साली टेलरिंग आणि सर्वोत्तमव नाजूक एम्ब्रॉयडरीसह झाली. चार दशकांपासूननीरूज्‌ महिलांसाठी आकर्षक एथनिक वेअर बनवत आहेत. भारतीय फॅशन बाजारपेठे मधील आपल्या यशस्वी कारकिर्दीसह आज नीरूज्‌ ची  २० भारतीयशहरांमध्ये ४० एक्सक्लूजिव्ह स्टोअर्स आहेत आणि यात दुबई येथील त्यांच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय स्टोअरचाही समावेश आहे.

#update_urself