*पुण्यातल्या  थॅलेसेमिया ग्रस्त मुलांना राउंड टेबल इंडियाकडून मदतीचा हात*

वंचित मुलांकरिता कार्य, राउंड टेबल इंटरनॅशनलचे अध्यक्ष यान टॅवेर्नीयर यांची उपस्थिती

news24live : पुण्यातल्या  थॅलेसेमिया ग्रस्त मुलांना राउंड टेबल इंडियाकडून मदतीचा हात हॉस्पिटल येथे राउंड टेबल इंडियाची परिषद आज दुपारी पार पडली. यात जवळजवळ १००हून अधिक शुभचिंतक आणि पाहुण्यांची उपस्थिती बघायला मिळाली. राउंड टेबल इंडियामुळे ४ थॅलेसेमिया ग्रस्त मुलांना आयुष्याची एक नवी संधी मिळाली, ही त्यांची सेकंड इनिंग त्यांना राउंड टेबल इंडियामुळेच मिळू शकली. हे सगळे दृश्य बघून उपस्थीत सगळेच भारावून गेले.

आज पुना हॉस्पीटल नवी पेठ येथे थॅलेसेमिया आजाराबाबत जागरूकता कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता ह्यावेळी  आरटीआय, पीएसआरटी १७७ चे अध्यक्ष ललित पिट्टी ह्यांनी  राउंड टेबल इंडियाचे ब्रँड अॅम्बेसिडर  जॅकी श्रॉफ ह्यांच्या बरोबर थॅलेसेमिया जागरूकता कार्यक्रमाची घोषणा केली. समारंभाची सुरूवात दिपप्रज्वलाने झाली ह्यावेळी कार्यक्रमाची प्रस्तावना ललित पिट्टी यांनी केली. ह्यावेळी आपले विचार व्यक्त करताना ते म्हणाले की, “राउंड टेबल इंडियाकरिता हा एक महत्वपूर्ण दिवस आहे, शिक्षण क्षेत्रात आम्ही अतिशय विलक्षण कार्य केले असून आता वैद्यकीय क्षेत्रात पाउल ठेवत आहोत याचा आम्हाला नितांत आनंद आहे, असेच समाजहिताचे कार्य करण्याचे आमचे ध्येय आहे”. 

पुढे आणखी माहिती देताना ललित पिट्टी म्हणाले, पीएसआरटी 177 ने पुण्यातल्या चार थॅलेसेमिया ग्रस्त मुलांच्या उपचाराचा भार उचलला आहे. या भयंकर आजारांविषयी समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे. राउंड टेबल इंडिया नियमित उपचार, औषधे आणि रक्तसंक्रमणासह मुलांना बरे करण्यास मदत करत आहे. राउंड टेबल इंडियाने ब्रँड अॅम्बेसिडर  जॅकी श्रॉफ यांच्या समवेत आजतागायत शिक्षण क्षेत्रात लक्षणीय बदल घडवून आणले असून आता वैद्यकीय क्षेत्रात कार्य करण्याचा  मानस आहे. थॅलेसेमिया हा एक अनुवंशिक रक्त विकार आहे जो शरीरात हीमोग्लोबिनची कमतरता आणि प्रमाणापेक्षा कमी लाल रक्त पेशींमुळे होतो. श्वेता तळवळकर, समर्थ मंजुळे, पार्थ फाळके आणि मेघा सेजपाल ह्या चार मुलांचा खर्च राउंड टेबल इंडिया करणार आहे. 

१९६२ साली स्थापना झालेली राऊंड टेबल इंडिया एक गैर-राजकीय, असांप्रदायिक आणि विना नफा तत्वावर कार्यरत गैर-सरकारी संस्था आहे. १८ ते ४० वयोगटातील तरुण व यशस्वी लोक राऊंड टेबल इंडियाचे सदस्य आहेत. समुदाय सेवा, स्वयं विकास, शिष्यवृत्ती व आंतर-राष्ट्रीय संबंध सुधरविण्याच्या उद्देशाने हे कार्य २० ते २५ सदस्यांच्या ‘टेबल्स’ द्वारे सुरू आहे. राऊंड टेबल इंडिया ही राऊंड टेबल इंटरनॅशनलची सक्रिय सदस्य आहे.   

या प्रसंगी बोलताना, राउंड टेबल इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि राउंड टेबल इंडियाचे कंम्पॅशनेट ब्रँड अॅम्बेसेडर यान टॅवेर्नीयर म्हणाले, “ह्या रोग्यांसाठी माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे, मुले आपले भविष्य आहेत आणि या रोगाचा भयानक परिणाम त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर झालेला बघणे हे फार दुखद आहे. ह्याच कारणाने आम्ही मदतीचे पाउल उचलले आहे आणि संपूर्ण उपचाराची काळजी घेणार आहोत”

ब्रँड अॅम्बेसिडर  जॅकी श्रॉफ ह्यांनी ऑडियो व्हिडियो प्रेसेंटेशनद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधला. ह्यावेळी त्यांनी राउंड टेबल इंडिया टीमच्या कार्याची प्रशंसा करीत त्यांना पुढील कार्यासाठी अनेक शुभेच्छादेखील दिल्या.  

रुबी हॉस्पिटलचे डॉ. विजय रामानन गेल्या कित्येक वर्षांपासून ह्या समस्येवर काम करीत आहेत. राउंड टेबल इंडियाच्या या चळवळीत ते सहभागी झाले असून या रोगाशी झुंजणाऱ्या मुलांना ठणठणीत बरे करण्याची जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. राउंड टेबल इंडियाकरिता ही एक अत्यंत महत्वाची बाब आहे.  

#update_urself