*पुण्यातील शिवानी नाईक शहा प्रतिष्ठित  मिसेस इंडिया “क्वीन ऑफ सब्स्टन्स 2018″ची  विजेती*

news24live : पुण्यातील शिवानी नाईक शहा यांनी  “मिसेस  इंडिया क्वीन ऑफ सबस्टन्स  2018″ हे  प्रतिष्ठित मुकुट जिंकले  आहे. दिल्लीत नुकताच 
 हा  समारंभ  पार  पडला. ह्या  ग्लॅमरस  सोहळ्यात  अनेक  मान्यवर  मंडळींची  उपस्थिती  बघावयास  मिळाली.  ज्यूरी पॅनलमध्ये बॉलिवूड दिवा  महिमा चौधरी, एव्हरग्रीन मिस इंडिया पूनम ढिलॉन, दिग्दर्शक रितिका विनय आणि विनय यदावा,  रीता गंगवानी (मिस वर्ल्डच्या प्रशिक्षक), डॉ. शिशिर पलासापुरे, डॉ. दीप्ति ढिल्लन, डॉ अदिति भटनागर, डॉ वरुण कटयाल, डॉ शरद कोहली आणि पामिकी कौल यांचा  समावेश होता.
ग्लॅमॅर आणि फॅशन उद्योगातील विविध तज्ज्ञांद्वारे ह्या  समारंभाचे  परीक्षण  करण्यात  आले .  तीन दिवसांच्या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या  स्पर्धेत कॅनडा, यूके, ब्रिटन आणि भारत सारख्या देशांतील ४८ स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग  बघायला  मिळाला. फिटनेस / कौशल्य   / सांस्कृतिक यांसारख्या  विविध  फेरींच्या आधारावर स्पर्धकांची निवड करण्यात आली.
महिमा चौधरी, पूनम ढिल्लन  आणि मिसेस भावना मल्होत्रा ​​(मिसेस इंडिया क्वीन ऑफ सब्स्टन्स 2017-2018) या मान्यवरांच्या  हस्ते शिवानी नाईक शहा यांना ‘मिसेस इंडिया क्वीन ऑफ सब्स्टन्स 2018’ने  सन्मानित  करण्यात आले. “मिसेस फेमस”चे  शीर्षक सुद्धा  शिवानी  ह्यांना  मिळाले. आपल्या प्रवासाविषयी बोलताना शिवानी म्हणतात, “हा सन्मान मिळणे ही  माझ्यासाठी  अत्यंत  अभिमानाची  बाब  असून  माझ्या कुटुंबाच्या, मेंटर्स  आणि शुभचिंतकांच्या समर्थनाशिवाय हे शक्य झाले नसते.”
ह्यापूर्वी त्यांनी अनेक  स्पर्धेमध्ये  सहभाग  घेतला असून  मिस युनिव्हर्स इंडिया 2012च्या  उपांत्य  फेरीपर्यंत  त्या  पोहोचल्या  होत्या  ज्याचे  सध्या 
मिस डीव्हा हे  नाव  आहे.  मिसेस इंडिया अर्थ 2017च्याही  त्या  अंतिम  फेरीपर्यंत  पोहोचल्या  होत्या, पर्यावरण  आणि  निसर्गाकरिता काम  करणाऱ्या  स्त्रियांना  हा  सन्मान  दिला  जातो. ‘उत्कृष्ट शैक्षणिक आणि अतिरीक्त परफॉर्मन्स इन स्कूल अॅण्ड कॉलेज’ साठी 2005-2009 या वर्षासाठी प्रतिष्ठित श्री धीरुभाई अंबानी फाऊंडेशन अंडर ग्रेजुएट स्कॉलरशिपने  गौरविण्यात आले. भारत सरकार आणि  महाराष्ट्र  सरकारच्या  “इस  ऑफ  डुईंग  बिझनेस  २०१८ आणि स्वच्छ भारत अभियानासाठी  सल्लागार  म्हणून  काम  सांभाळते.
अलीकडेच, लोकमत ग्रुपच्या ‘सखी मंचा’ने तिला “वूमन अचिव्हर”ने  सन्मानित  केले. ‘मनाचा फेटा’  आणि  स्वरकूल  फाउंडेशनतर्फे  ‘दि  ग्रेट महाराष्ट्रीयन अवॊर्ड’नेही  त्यांना  सन्मानित करण्यात  आले  आहे. 
शिवानी सध्या विशिंग फॅक्टरीसाठी ट्रस्टी म्हणून कार्यरत आहे, विशिंग फॅक्टरी ही  एक  स्वयंसेवी संस्था कॅन्सर आणि थॅलेसेमियाच्या रुग्णांना वैद्यकीय मदत मिळवून  देण्याचे कार्य  करते. झोपडपट्टीतल्या मुलांना पोषण आणि शिक्षण देण्यासाठी कार्य  करीत  असलेल्या रॉबिन हूड आर्मीसोबत देखील  त्या काम करतात. 
शीवानी म्हणते की, आता अनेक फॅशन आणि मॉडेलिंग प्रोजेक्ट्स मध्ये सहभाग घेणे माझा उद्येश्य आहे. आणि शिक्षण, वैद्यकीय सुविधा, वंचित मुलं आणि तरुणांचा  विकास करून  समाजउपयोगी कार्य  करने माझे ध्येय आहे.
#update_urself