*शुरवीर जीवाजी महाले यांना अभिवादन करण्यासाठी शिव शंभु शिल्पसृष्टीत मावळ्यांचा जनसागर*

news24live: छत्रपती शिवरायांचे अंगरक्षक शुरवीर जीवाजी महाले यांना , त्यांच्या 383 जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी आज मंगळवारी (दि.9 ) सिंहगडाच्या पश्चिमेला असलेल्या निगडे मोसे येथील शिवशंभू शिल्पसृष्टीत मावळ्यांचा जनसागर लोटला होता.
IMG-20181009-WA0030
मावळा जवान संघटना तसेच सिंहगड परिसरातच्या वतीने शुरविर जीवाजी महाले यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन केले होते. शुरविर जीवाजी महाले यांचे थेट वंशज संतोष सपकाळ यांच्या हस्ते जीवाजी महाले यांच्या स्मारकास पुष्पाहार अर्पण करून महोत्सवास सुरुवात झाली. जिवाची महाले यांच्या जीवनावरील विशेष टपाल पाकीट , त्यांच्या घराण्यातील शिवकालीन शस्त्र ,ऐतिहासिक दस्त आदीं पाहण्यासाठी शिवभक्तांनी गर्दी केली होती. जेष्ठ शिवभक्त व सामाजिक कार्यकर्ते दिलीपदादा नवले अध्यक्षस्थानी होते. शुरयोध्दा गोविंद गोपाळ यांचे वंशज राजेन्द्र गायकवाड ,

IMG-20181009-WA0034

भाजपचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संदिप पोकळे, ह.भ प .विलास कदम, विजय तनपुरे , प्राचार्य भागवत सपकाळ ,गणेश सपकाळ , रमेश कुटे ,गणैश कुटे , अशोक सपकाळ ,शशिकांत जाधव ,पायगुडे ,राजू पंडित आदी उपस्थित होते. प्रस्ताविक इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे यांनी केले.
राजेन्द्र गायकवाड म्हणाले , छत्रपती शिवाजी महाराज यांनी जाती भेद गाढून राष्ट्रीय बाण्याची शिकवण रुजवली. आठरापगड जातीच्या वीर मावळ्यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी बलिदान दिले. जिवाची महाले यांच्या शाैर्याने स्वराज्याचा रणसंग्राम अजरामर झाला.

news24live.in

#update_urself