*’पाटील’या गिताने जिंकली चित्रपट रसिकांची मने…अनेकांनी धरला चित्रपटगृहात ठेका*  

पुणे,news24live:
                                     ‘पाटील′ या आगामी मराठी चित्रपटातील ‘पाटील पाटील …’ हे धडाकेबाज गाणे सध्या चांगलेच लोकप्रिय झाले आहे. चित्रपटसृष्टीत नव्याने उदयास आलेल्या ‘सोनाली-उदय’ या नवीन संगीतकार जोडीने स्वरबद्ध केलेले हे गाणे आनंद शिंदे. आदर्श शिंदे आणि गायिका सोनाली पटेल यांनी गायले असून या गाण्यास रसिकांची चांगली पसंती मिळाली आहे. ‘शिवबाची आन तू, राष्ट्राची शान तू …..’ अशा शब्दात  ‘पाटलांचा’ ऐतिहासिक गौरव करणारे हे गाणे वीररसात्मक असून ‘पाटीलकी’चे गोडवे गाणाऱ्या या गाण्यावर रसिक विशेषतः ‘पाटील′ मंडळी खुश झाली आहेत. या गीताची रचना संजय वारंग व एस.आर.एम.एलियन यांची आहे. 
                                ‘पाटील′ चित्रपटात एकूण पाच गाणी असून ‘तुला पाहून’ हे रोमँटिक गीत बिष्णू मोहन, बेला शेंडे यांच्या गायकीने खुललं आहे. ‘सूर्य थांबला’ या मनस्पर्शी गीताला सुखविंदर सिंग व रेहा  विवेक यांचा स्वर लाभला आहे. ‘राधेला पाहून’ व ‘धिन ताक धिन’ या ठेका धरायला लावणाऱ्या गीतांना गणपत मिजगर, बाबुल सुप्रियो, श्रेया घोषाल यांनी स्वरबद्ध केलं आहे. या चित्रपटाला सोनाली-उदय यांच्याखेरीज आनंद-मिलिंद, प्रभाकर नरवाडे, एस.आर.एम.एलियन यांनी संगीत दिले आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे. या मराठी चित्रपटाचा संगीत अनावरण सोहळा नुकताच महसूल आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते मुंबईत एका भव्य समारंभात पार पडला. या कार्यक्रमाला राजकीय, सामाजिक आणि चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. 

 

20181116_024056
               स्टार क्राफ्ट मनोरंजन प्रा.लि., सचिकेत प्रोडक्शन्स, शौभम सिनेव्हिजन्स प्रा.लि निर्मित ‘पाटील′ हा चित्रपट येत्या २६ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन संतोष राममीना मिजगर यांचे असून या चित्रपटात एक ध्येयवेडया पिता-पुत्राचा संघर्ष चित्रित करण्यात आला आहे. दिग्दर्शक संतोष मिजगार यांच्यासह शिवाजी लोटन पाटील, वर्षा दांदळे, भाग्यश्री मोटे, नरेंद्र देशमुख, प्रतिमा देशपांडे, सुरेश पिल्ले, कपिल कांबळे यश आदि कलाकारांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. विशेष भूमिकेत डॉ.जगदीश पाटील (कोकण आयुक्त) दिसणार आहेत.

news24live.in

#update_urself