*व्हीजन इंडिया २०३० :आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या आंतरराष्ट्रीय वाणिज्य परिषदेचे उद्घाटन*

 

‘ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स् ‘ साध्य करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज

news24live Pune :

‘युनायटेड नेशन्सने सर्वांसमोर उद्दिष्ट म्हणून ठेवलेले ‘ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स् ‘ जगासाठी हितकारक आहेत , ते साध्य करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे ‘ असे प्रतिपादन विकसनविषयक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. निहाल मयूर यांनी आज केले.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयातर्फे ‘व्हिजन इंडिया २०३०’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय वाणिज्य परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. निहाल मयूर यांच्या हस्ते ,डॉ कुलजित उप्पल यांच्या उपस्थितीत १८ जानेवारी रोजी ,सकाळी ११ वाजता या परिषदेचे उद्घाटन झाले.

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार हे उद्घाटन समारंभाला अध्यक्ष म्हणून उपस्थित होते .

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या (आझम कॅम्पस ) असेम्ब्ली हॉल येथे ही परिषद सुरु झाली.

अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, ‘महिला शिक्षणाकडे दुर्लक्ष झाल्याने भारत आंतरराष्ट्रीय उदिष्टे साध्य करण्यात मागे आहे. मात्र, स्वातंत्र्योत्तर काळात आपण प्रगती केली असून जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आपल्यात आली आहे.

केंद्रीय विद्यापीठ आयोगाचे उपाध्यक्ष डॉ भूषण पटवर्धन हे परिषदेच्या समारोप कार्य्रक्रमाला १९ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता उपस्थित राहणार आहेत .

आबेदा इनामदार ,मुझफ्फर शेख, इरफान शेख,डॉ.एम.जी. मुल्ला व्यासपीठावर उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. शैला बूटवाला यांनी प्रास्ताविक केले.डॉ. आफताब आलम यांनी आभार मानले.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील ६ विद्यापिठातून १२० तज्ज्ञ ,संशोधक,प्राध्यापक या परिषदेला उपस्थित आहेत. ६५ संशोधनपर पेपर्स (शोध निबंध )सादर केले जाणार आहेत .

news24live

#update_urself