*जगातील सर्वात मोठ्या घुमटाच्या परिसरात शिवरायांचा अश्‍वारूढ पुतळ्याचे १९ फेब्रुवारी रोजी लोकार्पण*

पुणे, न्यूज 24लाईव्हबहुजन प्रतिपालक युगपुरूष व संपूर्ण जगासमोर इतिहास घडविणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारूढ पुतळ्याचे शिवजयंतीच्या दिवशी म्हणजेच १९ फेब्रुवारी २०१९ रोजी जगातील सर्वात मोठ्या घुमटाच्या परिसरात, विश्‍वराजबाग, लोणी काळभोर येथे लोकार्पण होणार आहे. एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी एडीटी विद्यापीठ यांच्यातर्फे हा पुतळा उभारण्यात येणार आहे. अशी माहिती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड यांनी दिली.
जागातील सर्वात मोठ्या घुमटाला भेट देणार्‍या पर्यटकांना सर्व प्रथम महाराजांचे दर्शन घडविण्यासाठी हा अश्‍वारूढ पुतळा बसविण्यात येत आहे. त्याच प्रमाणे येथील विद्यार्थ्यांना सतत महाराजांच्या कार्यांची प्रेरणा मिळत राहावी यासाठी हा पुतळा येथे बसविण्यात आला आहे. सुरूवातीपासून येथे महाराजांचा पुतळा बसविण्याचा संकल्प होता. तो आज पूर्ण झाला असे प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी सांगितले.
IMG-20181007-WA0075
         छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अश्‍वारूढ असून त्याची उंची १५ फूट आहे. या पुतळ्याची निर्मिती प्रसिद्ध शिल्पकार निलेश खेडकर यांनी केली आहे. जवळपास २ टन ब्राँझचा वापर करून त्याची निर्मिती केली आहे. राजबाग, लोणी काळभोर येथील कॅम्पसच्या प्रवेश द्वाराच्या आतमध्ये आल्यावर प्रथम महाराजांचे दर्शन होईल. त्यांना पाहिल्यावर संपूर्ण जगात भारत मातेचा संदेश देणार्‍या या भूमीची महती जनतेला कळेल. त्याच प्रमाणे महाराजांच्या या पुतळ्यामुळे परिसराच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे. येथे येणारे विद्यार्थी व पर्यटकांना महाराजांकडे पाहून प्रेरणा मिळेल.
राजबाग, लोणी काळभोर येथील कॅम्पसमध्ये या पुतळ्याचे आगमन नुकतेच ढोल ताशाच्या गजरात झाले. त्यानंतर  प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश तु. कराड, कुलगुरू डॉ. सुनील राय, तुळशीराम दा. कराड, काशीराम दा. कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम. पठाण, हवेली पंचायत समितीचे सदस्य युगंधर उर्फ सन्नी काळभोर, लोणी काळभोर ग्रामपंचायतचे माजी सरपंच शरद नाना काळभोर, सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन विठ्ठल काळभोर, लोणीकाळभोर येथील राष्ट्रवादीचे युवानेते कमलेश काळभोर, ग्रामपंचायतचे सदस्य अण्णा पाटील काळभोर, लोणी काळभोरचे माजी उपसरपंच कृष्णा पवार, माजी सदस्य संतोष गायकवाड, लोणी काळभोर येथील सुभाष वाळके, सुबराव कदम यांच्या बरोबरच लोणी काळभोर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच विद्यापीठातील कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
news24live.in #update_urself #news24live