*’कथक परंपरा’ : नृत्य आणि संगीत महोत्सवाची पुणेकरांसाठी मेजवानी* 

पुणे news24live: कथक  नृत्यामधील अग्रणी स्वर्गीय गुरू कुंदनलाल गंगानी आणि स्वर्गीय गुरु रोहिणी भाटे  यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सन्निधान ट्रस्ट तर्फे  दि. ३१ मे आणि १ जून (२०१९) रोजी  ‘कथक परंपरा’  हा दोन दिवसाचा खास  ‘नृत्य आणि संगीत महोत्सव’  आयोजित करण्यात आला असून संगीत रसिकांसाठी ती एक पर्वणीच ठरणार आहे.  
                 यानिमित्त  कथक  नृत्यामधील नवोदित कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी  शुक्रवार दि. ३१ मे  रोजी सायंकाळी ५. ३० वाजता आदर्श अभिनव ऑडिटोरियम (अभिनव स्कुल, एरंडवणे) येथे  अमृता गोगटे आणि त्यांचे सहकलाकार, तसेच गुरु नीलिमा हिरवे आणि गुरू नेहा मुथियान यांचा शिष्यवृंद कथक नृत्य सादर करतील याशिवाय गुरु सुजाता भिडे यांच्या संराधन कथक डान्स अकादमी आणि गुरु आभा वांबूरकर यांच्या दीक्षा कथक डान्स अकादमीचे विद्यार्थीही यावेळी आपली कला सादर करणार आहेत. 
guruji (1)
                                 
शनिवार दि. १ जून रोजी सायंकाळी ५. ३० वाजता  कोथरूड मधील  यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात होणाऱ्या  नृत्य आणि तालवाद्य  महोत्सवात प्रारंभी  धीरेंद्र तिवारी यांचे कथक नृत्य होणार असून त्यानंतर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तालवादक उस्ताद तौफिक कुरेशी (झेंबे) , प्रसिद्ध जलतरंगवादक मिलिंद तुळाणकर आणि प्रसिद्ध तबलावादक  रामदास पळसुले यांची जुगलबंदी रंगणार आहे. 
IMG-20190502-WA0014
याशिवाय सुप्रसिद्ध नर्तक पं. राजेंद्र गंगाणी यांचे कथक नृत्यही यावेळी होणार असून कार्यक्रमाची सांगता उस्ताद तौफिक कुरेशी,  मिलिंद  तुळाणकर, रामदास पळसुले आणि पं. राजेंद्र गंगाणी यांच्या एकत्रित कलाविष्काराने होणार आहे.
news24live.in #update_urself #news24live