*हरबाई चुन्नीलाल गोयल  चैरीटेबल ट्रस्टतर्फे १८ ऑगस्ट २०१९ रोजी पुण्यात महारक्तदान शिबिर संपन्न,तरूणांचा मोठा सहभाग*

पुणे: विवेककुमार की रिपोर्ट –

हरबाई चुन्नीलाल गोयल चैरीटेबल ट्रस्टतर्फे १८ ऑगस्ट २०१९ रोजी भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन पुण्यातील बोपोडी येथील जुन्या मुंबई पुणे हायवेवरील अग्रवाल समाज धर्मशाळा येथे करण्यात आले होते.
                या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दापोडीचे नगरसेवक रोहित (अप्पा) काटे,बोपोडीचे नगरसेवक प्रकाश ढोरे, अग्रवाल समाज फेडेरेशनचे अध्यक्ष व उद्योजक कृष्णकुमार गोयल,हरबाई चुन्नीलाल गोयल चैरीटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष गोकुळचंद महाजन, अग्रवाल समाज फेडेरेशन महिला समितीच्या अध्यक्षा नीता अग्रवाल,हरबाई चुन्नीलाल गोयल चैरीटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्षा श्रीमती सरला महाजन, खजिनदार मनिराम गुप्ता,सहखजिनदार घनश्याम अग्रवाल,सहसचिव सत्यजित पाटील,रक्तदानशिबीराचे व्यवस्थापक महेंद्र अग्रवाल,अग्रवाल समाज दापोडीचे अध्यक्ष जयकिशन अग्रवाल,राजेश अग्रवाल ,समाजसेवक राजेंद्र बहिरट हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 फोटो: हरबाई चुन्नीलाल गोयल चैरीटेबल ट्रस्ट भव्य          महारक्तदान शिबिर

VideoCapture_20190818-212838
                         याप्रसंगी हरबाई चुन्नीलाल गोयल चैरीटेबल ट्रस्टचे विश्वस्त सौरभ गोयल, गरिमा गोयल, ऍड,धनंजय कोरडे, रुख्मिणी अग्रवाल,प्रीती तांबट,नीरज तांबट,हितेश बाफना,अमित अग्रवाल,विनोद जालान,सुभाष सिंघल, विनोद अग्रवाल, सुमन अग्रवाल, ब्रिजमोहन अग्रवाल,राजेंद्र गोयल,किरण गोयल आदी मान्यवर उपस्थित होते.

फोटो: हरबाई चुन्नीलाल गोयल चैरीटेबल ट्रस्ट भव्य          महारक्तदान शिबिर

VideoCapture_20190818-212648
             या वेळी बोलतांना गोकुलचंद महाजन म्हणाले कि,रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे सध्या गरजूंना रक्ताची गरज भासते या गरजे मुळेच मी माझ्या आईच्या स्मुती दिनानिमित्त या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते व या नंतरही असेच समाजोउपयोगी उपक्रम आमच्या ट्रस्ट तर्फे राबविण्यात येणार आहेत. तसेच या पुढेही कोल्हापूर-सांगली -सातारा मधील पूरग्रस्त नागरिकांना ट्रस्ट तर्फे मदत व रक्त संचय पाठविला जाणार आहे.या चैरीटेबल ट्रस्ट तर्फे वृद्धाश्रम ,अनाथाश्रम ,गो-शाळा, चैरीटेबल शाळा ,चैरीटेबल हॉस्पिटल निर्माण करण्याचा उद्देश आहे .
      फोटो: हरबाई चुन्नीलाल गोयल चैरीटेबल ट्रस्ट भव्य          महारक्तदान शिबिर 

20190818_195749
आपल्या भाषणात नीता अग्रवाल म्हणाल्या कि, महिलांमध्ये रक्ताची कमतरता असते त्या मुळे अशा महिलांना ट्रस्ट तर्फे निश्चितच रक्तदानाद्वारे उपयोग होईल.या हरबाई चुन्नीलाल गोयल चैरीटेबल ट्रस्ट चे काम समाजोपयोगी आहेत.
                            हरबाई चुन्नीलाल गोयल चैरीटेबल ट्रस्टतर्फे यापूर्वीही अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत.हे रक्त संकलन ओम ब्लड बँक तर्फे करण्यात आले. पुण्यातील तरुण,विद्यार्थी,विद्यार्थिनी,नागरिक,महिला या सर्व घटकातील लोकांनी गरजू रुग्णाच्या सेवेसाठी स्वयंप्रेरणेने सहभाग घेतला.
news24live.in #update_urself