*निकाला आधीच आमदार झाल्याचा फ्लेक्स लावणारा राष्ट्रवादीचा उमेदवार पडला*

न्यूज 24 लाईव्ह : विधानसभा निवडणुकीआधी विजयाचा गुलाल उधळणारे खडकवासला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांचा पराभव झाला आहे. सचिन दोडके यांच्या कार्यकर्त्यांनी निकालाआधीच बॅनरबाजी केली होती. सचिन दोडके यांच्या विरोधात भाजपचे भीमराव तापकीर हे निवडणुकीच्या मैदानात होते. दोडके यांच्या समर्थकांनी निवडणुकीच्या निकालाआधीच जल्लोषाची तयारी जोरदार केल्याचं पाहायला मिळालं होतं. खडकवासला विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार भिमराव तापकीर यांनी आपला गड राखत सचिन दोडके यांचा पराभव केला आहे. दरम्यान, 2014 च्या निवडणुकीत भाजपचे भीमराव तापकीर हे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते.

#news24live #update_urself