*”प्रत्येक अभियंत्यामध्ये असतो एक कलाकार” : गिरीष खेडकर*

“अभियंता ते अभिनेता” विद्यार्थी व पालकांसाठी  करिअरविषयी परिपूर्ण माहिती infinity academy युट्युब चॅनल! 
पुणे – अभियंत्यांमध्ये प्रत्येकात काहीतरी कलागुण असतात. अशाच अभियंत्यांमध्ये कलागुण साकारण्याची इच्छा असते. व त्या कलागुणांना वाव देण्यासाठी “इन्फिनिटी इंजिनीरिंग अकॅडमी” तर्फे “अभियंता ते अभिनेता’ या वेबिसरीजव्दारे नवीन प्रयोग साकारला आहे.
“अभियंता ते अभिनेता” या वेबसिरीजसाठी कलाकारांच्या  स्पर्धा आयोजित केले होते. या प्रसंगी
   इन्फिनिटी इंजिनीरिंग अकॅडमीचे संचालक गिरीष खेडकर व स्वप्नील भोर, वेबसिरीजचे दिग्दर्शक अशोक पालवे, यांच्या वतीने  पाच विजेते निवडून प्रथम क्रमांकास “अकरा हजाराचे” रोख बक्षीस    इन्फिनिटी इंजिनीरिंग अकॅडमीचे “चे संचालक गिरीश खेडकर व स्वप्नील भोर यांनी दिले व यावेळेस बोलताना खेडकर म्हणाले अभियांत्रिकेच्या विद्यार्थांसाठी स्पर्धा परिक्षांबाबत जागृती निर्माण करण्यासाठी यु ट्यूब चॅनल सुरू केलेले आहे.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थीसाठी ऑडिशनशन घेतले होते. त्यामधुन 24 जणांची निवड केली. यामध्ये मुंबईच्या ऍक्टर फॅक्टरीकडून या विद्यार्थ्यांना ग्रुमिंग केले. व त्यातुन त्यांच्या चुका सुधारून त्यांच्याकडून अभिनय करून घेतला . या इनफीनिटी इंजिअरिंग ऍकॅडमीच्या वेबिसरीज चॅनलला 22 हजार लोकांनी सबस्क्राईब केले आहे. अभियांत्रिकीच्या स्पर्धा परिक्षांचे माहिती, स्पर्धा परिक्षांचा अर्ज कसा भरायचा, स्पर्धा परिक्षांची तयारी कशी करायची. काही प्रशासकीय अधिकाऱ्यांचे व्ह‌िडीओ (चित्रफिती) या सर्वांची माहिती Infinity academey या यु ट्यूब चॅनल मध्ये आहेत.
परंतु काही ग्रामीण भागातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये रस नाही अशांसाठी अभिनयाच्या क्षेत्रातील करीअरसाठी “अभियंता ते अभिनेता”  स्टँड अप कॉमेडी हा पहिल्यांदाच नवीन प्रयोग सुरू करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नोकरीची गरज असते पण ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना असे वाटते की, शहरी भागातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करू शकत नाही. असा न्यूनगंड असतो. प्रत्येक अभियंत्यामध्ये कलागुण बाहेर काढण्याचा प्रयत्न इन्फिनिटी इंजिनीरिंग अकॅडमीने सुरू केला आहे.

IMG20191112162321
अभियंता म्हणजे पूर्वी फक्त नोकरी व प्रशासकीय सेवेत काम करणारे होते. परंतु “अभियंता ते अभिनेते या युट्युब चॅनेलद्वारे अभिनयाचा तिसरा पर्याय हा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी
अभियंते + अभिनेते असणाऱ्या कलाकारांना शोधणे, त्यांना सादरीकरणासाठी व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या पाठीवर शाबासकीचा हात फिरवणे हे कोणीतरी करणे आवश्यक असते. तो मदतीचा हात दिला आहे इन्फिनिटी या अभियांत्रिकी स्पर्धा परीक्षाना मार्गदर्शन करणाऱ्या सुप्रसिद्ध अकॅडेमीने.
या वेबिसरीजसाठी ग्रामीण व शहरी भागातील स्पर्धा परिक्षांची माहिती गमतीदार किस्से अभियांत्रिकीच्या हॉस्टेलमधले किस्से, इंडस्ट्रीयल भेटीचे किस्से मैत्रीमधल्या गोष्टी, नोकरी लागताना इंटरव्यूसाठीचे किस्से हा विषय ठेवला होता.  या वेबिसरीजमध्ये अभियांत्रिकीच्या विद्यार्थांचे अनुभव कथन थेट स्टॅंड अप कॉमेडी माफर्त मांडले आहे. उत्कृष्ट पध्दतीचा निखळ मनोजरंजन तयार करण्यात आला आहे.
अभियांत्रिकीच्या विद्यार्थांसाठी  व त्यांच्या पालकांसाठी स्पर्धा परिक्षांच्या माहीती व मार्गदर्शन तसेच अभिनय क्षेत्रातील नवीन संधीसाठी या अभियंता ते अभिनेता या वेबसिरीजची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील घराघरात या अभियंत्यांची कला गुण पोहचिवण्याचा अकॅडमीचा मानस आहे.
या वेबिसरीजच्या ऑडीशनमध्ये प्रथम पारितोषिक संकेत कर्जुले, द्वितीय पारितोषिक आशिष बाली, तृतीय पारितोषिक रामदास टेकाळे, चतुर्थ पारितोषिक अभिषेक काळे, पाचवे पारितोषिक देवयानी कुतवळ यांनी पटकाविले आहे. यामधुनच त्यांची निवड करण्यात आली आहे.
या अभिनयाच्या संधीचा व करियरचा नवीन पर्यायचा लाभ हा महाराष्ट्रातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आव्हान
इन्फिनिटी इंजिनीरिंग अकॅडमीने
संचालकांनी केले आहे.

news24live.in #update_urself