*जेनेट,रामेश्वरी,अभिलाषा ठरल्या ‘द गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र’*

 

पुणे, न्यूज 24 लाईव्ह : व्हाईट डिव्हाईन इव्हेंट्सच्या वतीने आयोजित ‘द गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र २०१९’ या सौंदर्य स्पर्धेचे विजेतेपद पुण्याच्या जेनेट अग्रवाल (इटर्नल ब्युटी), पुण्याच्या रामेश्वरी वैशंपायन (मिसेस) आणि चाळीसगावच्या अभिलाषा जाधव (मिस) यांनी पटकावले. तर इटर्नल ब्युटी प्रकारात औरंगाबादच्या स्वाती चव्हाण, पुण्याच्या मनाली देव, मिसेस प्रकारात इस्लामपूरच्या स्मिता पाटील, रावेरच्या (जळगाव) श्रुतिका पाटील, मिस प्रकारात पुण्याच्या कनक विसपुते, नागपूरच्या कृतिका जोगे यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. जेनेट अग्रवाल ‘ब्युटी विथ कॉज’च्याही मानकरी ठरल्या. स्पर्धेच्या संयोजिका व्हाईट डिव्हाईनच्या संस्थापिका डॉ. पल्लवी प्रसाद व सर्व विजेत्या सौंदर्यवतीनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. द गॉर्जिअस क्वीन इंटरनॅशनलसाठी निवड झालेल्या गीतांजली खैरनार यावेळी उपस्थित होत्या.

डॉ. पल्लवी प्रसाद म्हणाल्या, “या स्पर्धेचा ग्रँड फिनाले नुकताच पुणे-बँगलोर हायवेवरील सेव्हन हेवन हॉल, नवले लॉन्स येथे झाला. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत ऑडिशन्स आणि प्राथमिक फेर्‍या घेतल्यानंतर अंतिम स्पर्धेसाठी एकूण २३ स्पर्धक निवडण्यात आले होते. यामध्ये मिस, मिसेस आणि इटर्नल ब्युटी या तीन प्रकारात प्रत्येकी तीन स्पर्धक निवडले आहेत. ‘डिप्रेशन अवेअरनेस’ ही या स्पर्धेची मध्यवर्ती संकल्पना होती. या स्पर्धकांनी विविध कौशल्यांचे प्रदर्शन करीत उपस्थितांची मने जिंकली. भविष्यात समाजात तणावमुक्तीसाठी ब्रँड अँबेसेडर म्हणून या सौंदर्यवती आपले योगदान देणार आहेत.

यावेळी अभिनेत्री मेघा धाडे, ग्रुमर चाहत दलाल, दिग्दर्शक केदार गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते संतोष चाकणकर आदी उपस्थित होते. कुलदीप बापट यांनी छायाचित्रण, श्वेता केकाळ यांनी मेकअप, तर हिमाली राणे यांनी ड्रेस डिझाईन केले. तरुणींना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी दर वर्षी ‘द गॉर्जियस क्वीन ऑफ महाराष्ट्र २०१९’ या सौंदर्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. तरुणींमधील कलागुणांना नेहमी आम्ही वाव देण्याचा प्रयत्न करत असतो. या स्पर्धेच्या माध्यमातून तरुणी आपले कौशल्य आणि सौंदर्य विकसित करून आगामी काळात जाहिरात चित्रपट आदी क्षेत्रात पाऊल ठेऊ शकते असे डॉ. पल्लवी प्रसाद यांनी सांगितले.
news24live.in #update_urself