*पुणे शहरात पबजीच्या ऑनलाइन गेम व्यसनातून १६ वर्षीय मुलाची आत्महत्या*

 

पुणे, न्यूज 24 लाईव्ह (विवेककुमार) :- पुणे बिबवेवाडी येथे पबजी ऑनलाइन मोबाईल गेम व्यसनामुळे एका १६ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा दहावीत नापास झाला होता. तो त्याच्या आजी समवेत बिबवेवाडी येथे राहत असे. त्याचे वडील काही वर्षांपूर्वी वारले असून आई तीन मुलींना घेऊन मुंबईला निघून गेली होती. त्यामुळे त्याची आजी घरकाम करून त्याचा सांभाळ करीत होती.
पबजी या गेममुळे अन्यत्रही आत्महत्येचे प्रकार घडले आहे. या आत्महत्या केलेल्या मुलाला या गेमचे फार व्यसन लागले होते. त्याने १० दिवसांपूर्वीच नवीन मोबाईल घेतला होता. त्याच्या या सतत गेम खेळण्याच्या सवयीमुळे त्याची आजी त्याला रागवत असे मात्र, त्याचा या मुलावर काहीही फरक पडला नाही. पबजी प्रमाणेच त्याला स्वतःचे टीकटॉक व्हिडिओ बनवायचेही व्यसन लागले होते. घटने पूर्वी त्याने स्वतःचा आत्महत्या करतानाचा टिकटॉक व्हिडिओ देखील त्याने बनवला. होता व आजी झोपून गेली.आसता मध्यरात्रीनंतर तीन वाजता त्याने स्वतःला फासावर टांगले. त्याची आजी नेहमीप्रमाणे चार वाजता उठून स्वयंपाक घरात आली तेव्हा ही घटना उघडकीस आली.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठविला. त्यानंतर तो त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. तसेच तात्कालिक कारण नेमके काय घडले असेल याचाही पोलीस शोध घेत आहे. या घटनेमुळे पुण्यात मोठी खळबळ उडाली असून पबजी गेमवर बंदी आणायला हवी, अशी मागणी पुणे शहरातील नागरिकांमधून करण्यात येत आहे.

समाज प्रबोधनासाठी कृपया शेअर करा…

#news24live #update_urself
🌹💐🌻🌹💐🌻