*“शेअर इट विथ स्वप्नील“ चे रेडिओ मिरची तर्फे दुसरे पर्व सुरू..*

 

रेडिओ मिर्ची नेटवर्कतर्फे ‘शेअर इट विथ स्‍वप्‍नील’चे दुसरे पर्व सादर 
पुणे :   पहिल्‍या पर्वामध्‍ये भरपूर प्रशंसा केल्यानंतर भारताचे पहिल्‍या क्रमांकाचे रेडिओ स्‍टेशन रेडिओ मिर्ची 98.3 एफएम लोकप्रिय मराठी स्‍टार कलाकार स्‍वप्‍नील जोशी सोबतचा त्‍यांचा प्रसिद्ध रेडिओ शो ‘शेअर इट विथ स्‍वप्‍नील’चे दुसरे पर्व घेऊन येत आहे.
‘शेअर इट विथ स्‍वप्‍नील’ शोमध्‍ये लोक त्‍यांचे नातेसंबंध, विवाह, त्‍यांचे यश आणि यशस्‍वी प्रेम व द्वेषाच्‍या कथांबाबत सखोल गुप्‍त गोष्‍टी व कबुलीजबाब देतात. शोच्‍या पहिल्‍या पर्वामध्‍ये मराठी चित्रपटसृष्‍टीमधील लोकप्रिय व्‍यक्तिमत्त्‍वांचा समावेश होता, जसे सई ताम्‍हणकर, अंकुश चौधरी, सचिन पिळगावकर, सुबोध भावे, अमृता खानविलकर, अमेय वाघ.
दुस-या पर्वाबाबत आपले मत मांडताना रेडिओ मिर्चीचे महाराष्‍ट्रातील क्‍लस्‍टर व्‍यवसाय प्रमुख श्री. एम एन हुसैन म्‍हणाले, ”आम्‍हाला ‘शेअर इट विथ स्‍वप्‍नील’ शोचे दुसरा पर्व सादर करताना आनंद होत आहे. पहिल्‍या पर्वाला हजारो प्रवेशिका मिळाल्‍या आणि महाराष्‍ट्रातील रेडिओ श्रेात्‍यांमध्‍ये तो खूपच लोकप्रिय ठरला. रेडिओ ऐकण्‍यास चुकणा-या लोकांसाठी कन्‍टेन्‍ट उपलब्‍ध करून देण्‍यासाठी होत असलेल्‍या प्रचंड मागणीमुळे आम्‍हाला घोषणा करताना आनंद होत आहे की, एसडब्‍ल्‍यूएस सीझन २ देखील मिर्ची मुंबई मराठी वेब रेडिओवर स्ट्रीम करण्‍यात येईल, जो गाना अॅपवर उपलब्‍ध आहे.”
या शोबाबत बोलताना स्‍वप्‍नील म्‍हणाला, ”मिर्चीच्‍या रेडिओ स्‍टेशन्‍स नेटवर्कवरील ‘शेअर इट विथ स्‍वप्‍नील’ शोच्‍या पहिल्‍या पर्वाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून मला खूप आनंद झाला आहे. मला आनंद होत आहे की, लोकांनी माझ्या चित्रपटांप्रमाणेच रेडिओ अवताराचा देखील स्‍वीकार केला. सीझन २ पुरुष त्‍यांच्‍या जीवनातील महिलांबाबत कबुलीजबाब देण्‍यावर फोकस देईल आणि म्‍हणूनच थीम आहे ‘बोल ती ऐकतेय’, म्‍हणजेच मराठीत असा अर्थ होतो की ‘तू सांग, ती ऐकत आहे’. ‘शेअर इट विथ स्‍वप्‍नील’ शोची अधिक काळ वाट पाहू न शकणा-यांसाठी माझ्याकडे काही चांगल्‍या बातम्‍या आहेत. शोचे २ पर्व गाना अॅपवरील मिर्ची मुंबई मराठी चॅनेलच्‍या माध्‍यमातून प्रथम मुंबईतील श्रोत्‍यांसाठी सुरू करण्‍यात येईल. मला आनंद होत आहे की, हा शो फक्‍त ठराविक भौगोलिक सीमेपुरतीच मर्यादित राहणार नाही. या ऑनलाइन व्‍यासपीठामुळे मुंबईकर प्रवास करत असताना देखील माझ्यापर्यंत पोहोचू शकतात. मी आशा करतो की, श्रोते सीझन १ प्रमाणेच या सीझनचा देखील आनंद घेतील. तर मग फक्‍त महाराष्‍ट्रातील लोकांनाच नव्‍हे तर सर्व भारतीयांना आवाहन करण्‍यात येणार आहे की ‘सोड स्‍ट्रेस, कर कन्‍फेस’.”
यंदा शोमध्‍ये एक नवीन विभाग असणार आहे ‘कुछकट्टा’. यामध्‍ये सेलिब्रिटीज देखील सोशल मीडिया व्‍यासपीठावर त्‍यांना मिळणा-या क्षुद्र संदेशांबाबत दिलेल्‍या गुप्‍त प्रतिक्रियांची देखील कबुली देणार आहेत. शोचा कन्‍टेन्‍ट मिर्चीच्‍या सोशल मीडिया व्‍यासपीठांवर पॉडकास्‍ट्सच्‍या रूपात सादर करण्‍यात येईल.
रेडिओ मिर्ची बाबत:
एंटरटेनमेंट नेटवर्क इंडिया लिमिटेड (ENIL), जे भारतात रेडिओ मिर्ची नावाने लोकप्रिय आहे, ते भारतातील ६३ शहरांमधील ७३ वाहिन्यांचे मालक आणि तिघांचे जाहिरात भागीदार असतानाच भारतातील सर्वात मोठे खासगी एफएम रेडिओ प्रक्षेपक आहेत. २००१ मध्ये स्थापित झालेली मिर्ची आता देशभरात मिर्ची, मिर्ची लव्ह, कूल व इश्क (टीव्ही टूडे नेटवर्कचा जाहिरात भागिदार) अशा ४ अनोख्‍या ब्रॅण्‍ड्सचे संचालन करते. देशभरातील सर्वाधिक श्रोतावर्ग (जवळपास २९ दशलक्ष लोक) आणि नावीन्यपूर्ण कन्‍टेन्‍ट विकसित करण्‍याचा ट्रॅक रेकॉर्ड यामुळे मिर्ची, त्यांचे श्रोते आणि जाहिरातदार यांच्यांशी संबंध टिकवून ठेवण्‍यासोबत वाढवत आहे.
मिर्ची म्युझिक अवॉर्डस् (८ विविध भाषांमध्ये) आणि मिर्ची टॉप २० यांसारख्या लक्ष्यवेधी कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रोतावर्ग आणि सिनेसृष्टी यांना मिर्चीने आनंदी ठेवले आहे. मिर्ची देशातील सर्वात मोठी कॉन्सर्ट आयोजित करणारी कंपनी आहे. मिर्ची दरवर्षाला १०० हून अधिक कॉन्‍सर्टसचे आयोजन करते. २०१८ मध्‍ये मिर्चीने दिग्‍गज रॉकस्‍टर ब्रायन अॅडम्‍सचा पाच-शहरीय दौरा आणि जगातील पहिल्‍या क्रमांकाचा डीजे मार्टिन गॅरिक्‍सचा दोन-शहरीय दौ-याचे आयोजन केले. मिर्चीची डिजिटल क्षेत्रातील धडक – २१ ऑनलाइन रेडिओ स्टेशन्स, सर्वात मोठी रेडिओ वेबसाईट आणि सर्वात मोठे फेसबुक, ट्विटर व यूट्यूब मिर्चीचे स्थान सक्षम करून जातात. मिर्ची इन-हाऊस प्रतिभांचा वापर करत शोजची निर्मिती करते आणि हे शो यूट्यूब चॅनेल्‍स व विविध ओटीटी व्‍यासपीठांवर दाखवले जातात. रेडिओ मिर्ची दर महिन्‍याला त्‍यांच्‍या ऑनलाइन कन्‍टेन्‍टच्‍या माध्‍यमातून अंदाजे ५० दशलक्ष लोकांपर्यंत पोहोचते. मिर्ची हा पहिला भारतीय रेडिओ ब्रॅण्‍ड आहे, जो यूएईमधील ब्रॅण्‍डच्‍या सादरीकरणासह आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर पोहोचला आहे. २६ जानेवारी २०१९ रोजी मिर्ची यूएसमध्‍ये देखील लाँच करण्‍यात आला. ‘एअरपोर्ट रेडिओ’ कार्यसंचालन सुरूवात करणारा पहिला ब्रॅण्‍ड असलेला मिर्ची नवी दिल्लीचे टी३ आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि हैद्राबादमधील राजीव गांधी आंतरराष्‍ट्रीय विमानतळावर ऐकू शकतो. ऑन-एअर, ऑन-ग्राऊण्‍ड व ऑन डिजिटल इतका मोठा सार्वत्रिक विस्तार पाहून नक्कीच मिर्ची प्रत्येक ठिकाणी आहे, असे म्हणावे लागेल.
#news24live #update_urself