*समलिंगी संबंधांवर आधारित “काय बाय” हा मराठी चित्रपट १७ जाने.पासून प्रेक्षकांच्या भेटीला*

 

पुणे- काय बाय या मराठी चित्रपटाचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक व कलाकार यांची पत्रकार परिषद पुण्यातील प्रमुख पत्रकार संघ येथे आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत चित्रपटाचे निर्माते, लेखक व दिग्दर्शक चंद्रशेखर शितोळे, अभिनेत्री भाग्यश्री देसाई, अभिनेत्री शीतल पाटील, अभिनेता आशय कुलकर्णी, ओमकार साखरे, ओमकार दोरगे, अरुण नलावडे, वितरक शिवा बागुल उपस्थित होते.

गे-बाय-सेक्सऊल( एल जी बी टी) या विषयावर निर्माता / दिग्दर्शक चंद्रशेखर शितोळे यांनी “काय बाय” नावाचा मराठी चित्रपट बनवला आहे . ऑस्ट्रेलिया मध्ये हा सिनेमा प्रदर्शित झाला आहे आणि त्यास चांगला प्रतिसाद मिळाला आहे

चित्रपटाचे कथानक ऑस्ट्रेलिया स्थित एका मराठी कुटुंबापासून होते. अपघाताने पतीचे एका गे मुलाशी शारीरिक संबंध येतात. डोळ्यासमोर घडलेली हि घटना पेशाने डॉक्टर असलेली पत्नी पचवू शकत नाही. ती तिच्या वडिलांना बोलावून घेते व घटस्फोटाचा निर्णय सांगते. तिचे संपूर्णम्हणणे ऐकून घेतल्या नंतर तिचे वडील त्यांच्या भूतकाळातील अशी काही गोस्ट सांगतात कि जीसर्वाना स्तब्ध करून टाकते .

IMG_20200111_002950

मेलबर्न मध्ये छोटे- मोठे नाटक,शॉर्ट फिल्म करताना चंद्रशेखर शितोळे याना या चित्रपटाची कथा सुचली , लगेच त्यांनी चित्रीकरणास सुरुवात देखील केली. बराचश्या वाईट – गोड अनुभवातून हासिनेमा पूर्ण झाला आहे.याबद्दलची एक अत्यंत महत्वाची गोस्ट म्हणजे कथानकाच्या गरजेनुसारसहाय्यक कलाकार चंद्रशेखर शितोळे जे कि या सिनेमाचे दिगदशक देखील आहेत ,एकादृश्यासाठी त्यांना एका गे मुलासोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते. हा सिन खूप महत्वाचाअसल्याने तो रिअल वाटावा म्हणून संपूर्ण नग्न दृश्य घेणे गरजेचे होते, पुरुष्याचा संपूर्ण नग्नसिन कदाचित मराठी साठी नवीनच असावा . सिनेमातील हेच दृश्य दिग्दर्शकाच्या रीळ आणिरिअल लाईफ मध्ये हि मोठे वादळ घेऊन आले. चंद्रशेखर शितोळे यांनी या सिन ची माहितीत्यांच्या खऱ्या आयुष्यातील पत्नीला दिली होती परंतु तो सिन इतका बोल्ड आणि संपूर्ण नग्नअसेल याची कल्पना दिली न्हवती. शेवटी त्यांना पत्नीला समुपदेशाकडे घेऊन जावे लागले.

त्यामुळे हा सिनेमा त्यांच्या साठी खूप मोठ्या आठवणी देऊन गेला .

IMG-20200110-WA0028

या चित्रपटामध्ये आशय कुलकर्णी, सुनील गोडबोले, भाग्यश्री देसाई शीतल पाटील यांसारखेनावाजलेले तसेच ऑस्ट्रेलियातील वसुंधरा कटारे, अमेय साने, प्रांजली कर्वे, ऋषी कनोजिया आणि अमृत पटेल यासारखे नवखे तरीही अनुभवी कलाकारआहेत .संगीत आणि पार्श्वसंगीत यासिनेमाच्या जमेच्या बाजू आहेत . संत एकनाथ महाराजांच्या “देव एका पायाने लंगडा ” यागवळणीला संगीतकार – गायक श्रीकृष्ण चंद्रात्रेय यांनी खूप सुंदर साज चढवला आहे .सत्यजित

रानडे यांनी चित्रपटाचा ऑस्ट्रेलियातील आणि भारतातील भाग देशी-विदेशी ट्रॅक ने खूप सुंदरपद्धतीने रंगवला आहे.

तर असा हा वेगळ्या विषयावरचा वेगळ्या पद्धतीने मांडलेला सिनेमा आपण जरूर पाहावा अशी

दिग्दर्शक चंद्रशेखर शितोळे यांची अपेक्षा आहे.वेगळ्या एल जी बी टी या सामाजिक धाटणीचा विषय असलेला काय बाय हा एक आगळावेगळा सिनेमा १७ जानेवारी २०१९ पासून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे

#news24live #update_urself