*केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांना डीवाय पाटील विद्यापीठातर्फे डि.लीट प्रदान*

 

पुणे : रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना डीवाय पाटील विद्यापिठातर्फे डी. लिट पदवी देऊन गौरविण्यात आले. नेरुळ येथील डीवाय पाटील स्टेडियममध्ये भव्य सोहळ्यात रामदास आठवले यांना बिहारचे माजी राज्यपाल डॉ. डीवाय पाटील व कुलपती डॉ. विजय पाटीलयांच्या हस्ते डॉक्टर ऑफ लिटरेचर (डि. लीट) प्रदान करण्यात आली. आठवले यांनी सामाजिक क्षेत्रात केलेल्या अतुलनीय समाजसेवेमुळे आणि देशसेवेमुळे हा गौरव केला आहे.

यावेळी सीमाताई आठवले, कुमारजित आठवले, शकुंतलाताई आठवले, नंदाताई काशीकर यांसह संपूर्ण आठवले परिवार आप्तजन तसेच सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुण्यातून ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे, पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, शहराध्यक्ष अशोक शिरोळे, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, बसवराज गायकवाड, अल्पसंख्याक आघाडीचे ऍड. अयुब शेख आदी उपस्थित होते.

#news24live #update_urself