*स्टॅन्ड-अप कॉमेडियन निशांत तनवर आणि बॉलिवूड सिंगर मोहम्मद इरफान पुणेकरांच्या भेटीस*

पुणेकरांसाठी क्रेसेन्डो २०२०
पुणे,मुंबई आणि बंगलोर भागातून एकूण ८० हुन अधिक महाविद्यालयांचा प्रवेश 

 

पुणे :
विद्यार्थ्याच्या नीरस जीवन चक्रात, ज्यात प्रामुख्याने खाणे, झोपणे आणि व्याख्याने यांचा समावेश असतो, ‘कॉलेज फेस्ट्स’ विद्यार्थ्यांच्या प्रगतीत एक मोलाची कामगिरी बजावते. विद्यार्थ्यांसाठी इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिसनेस अँड मीडिया(आय एस बी एम )पुणे  घेऊन येत आहे एक अनोखा  ३ दिवसीय महोत्सव  “क्रेसेन्डो २०२०”. आकर्षक आणि भव्य असा हा  महोत्सव २० ते २२ फेब्रुवारी दरम्यान होणार आहे.क्रेसेन्डोचे हे  १५ वे वर्ष असून महाविद्यालयातील प्रत्येक क्षेत्रातील विद्यार्थी हा त्यात प्रवेश घेऊ शकणार आहे. या माद्यमातून विद्यार्थ्याला जीवनातील विविध क्षेत्रांतील  लोकांशी संवाद साधण्याची संधी प्रदान करण्यात येईल. अलीकडे  आय एस बी अँड एम ने  क्रेसेन्डोला २०२० ला अन रीलिंग द डीकेड्स या नावाची थिम दिली आहे.
या वर्षी पुणे,मुंबई आणि बंगलोर भागातून एकूण ८० हुन अधिक महाविद्यालयांचा प्रवेश असणार आहे .मागील वर्षांमध्ये क्रेसेंडोने असंख्य प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्याची विस्तृत संधी दिली. त्यात ग्रुप / सोलो सिंगिंग, नृत्य, नाट्यशास्त्र, बीटबॉक्सिंग इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
पत्रकार परिषदेत डॉ.प्रसंथा  कुमार दे – कार्यकारी संचालक आयएसबी अँड एम आणि डॉ. रवी जयस्वाल – कुलसचिव, आयएसबी अँड एम,यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे स्टॅन्ड-अप कॉमेडियन, निशांत तनवर आणि बॉलिवूड सिंगर मोहम्मद इरफान जे   22 फेब्रुवारी 2020 रोजी आयएसबी अँड एम लवले कॅम्पसमध्ये लोंकाचे मनोरंजन करतील.
यावर्षी एकूण ५००० विद्यार्थ्यांचा समावेश या कार्यक्रमात असणार आहे. 
#news24live #update_urself