*बॉक्स ऑफिसवर छप्परतोड कमाई करणाऱ्या ‘बबन’ सिनेमाचा स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर*

स्टार प्रवाहवर मनोरंजनाची अनोखी मेजवानीपहा कधीही हार न मानणाऱ्या बबनची कहाणी

बॉक्स ऑफिसवर छप्परतोड कमाई करणाऱ्या बबन सिनेमाचा स्टार प्रवाहवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

पुणे: बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवलेल्या ‘बबन’ सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर उद्या म्हणजेच २६ एप्रिलला दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे. लॉकडाऊनच्या काळात या सुपरहिट सिनेमाची मेजवानी स्टार प्रवाह वाहिनी घेऊन आली आहे.

राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सिनेमा ख्वाडाचे दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी बबन सिनेमा दिग्दर्शित केला आहे. ग्रामीण जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमात भाऊसाहेब शिंदे आणि गायत्री जाधव यांची प्रमुख भूमिका असून, हा सिनेमा मनोरंजनाबरोबरच सामाजिकतेचे अंजनदेखील डोळ्यात घालतो.

PROMO: https://www.facebook.com/StarPravahOfficial/videos/295623728099868/

तेव्हा या सुपरहिट सिनेमाची जादू सहकुटुंब सहपरिवार नक्की अनुभवा २६ एप्रिलला दुपारी ३ आणि संध्याकाळी ७ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.

#news24live #update_urself