*फादर स्टॅन स्वामी यांची त्वरीत सुटका करण्याच्या मागणीसाठी सत्याग्रह आंदोलन*

समस्त ख्रिस्ती समाज, पुणे ख्रिस्ती धर्मप्रांत, रिपब्लिकन युवा मोर्चा व सर्व पुरोगामी संघटनांकडून निषेध व फादर स्टॅन स्वामी यांची त्वरीत सुटका करण्याची मागणी

पुणे (प्रशांत निकम) –
खिश्चन जेज्यूयट फादर स्टेन्स स्वामी वय वर्ष ८३ यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने जाणीव पुर्वक भिमा कॊरेगाव प्रकरणात जाणीव पूर्वक गॊवले आहे व कॊणताही परिस्थीतीजन्य व सबळ पुरावा नसताना अटक केलेली आहे. याबाबत तीव्र निषेध नोंदविल्याची माहिती रीजनल ख्रिश्चान सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत केदारी व रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
विविध खिश्चन धर्मिय व अन्याया विरूध्द झगडणा-या सामाजीक संस्था सत्याग्रह आंदोलन व मागण्यांचे निवेदन पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे 15 ऑक्टोबर 2020 रोजी देणार आहे.
रिजनल खिश्चन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत केदारी म्हणाले की,भारतीय समाज सुधारण्याच्या कामात जग विख्यात असलेले जेज्यूयट फ़ादर्स जगभर आपले सेवाभावी कार्य निस्वार्थी भावनेतून करीत आहेत. अशा फ़ादर्स कधीही तथाकथीत भिमा कॊरेगाव प्रकरणात कॊणतीही अनुचित कृती करतील हे असंभवनिय आहे अशी आमची खात्री आहे. *दानधर्म करणे या देशात गुन्हा होतो हे अजबच आहे* देशातील आजचे जातीय वादी व समाजा समाजात दुही निर्माण करून कट कारस्थाने पेव फुटले आहे. आमचा राज्यघटनेवर पूर्ण विश्वास आहे. शंभर गुन्हेगार सुटले तरी एका संन्याशास शिक्षा होणार नाही हे तत्व आपण स्विकारले आहे. तर मग ८३ वर्षीय पक्षघाताने ( Parkingsons) आजाराने ग्रस्त फ़ादर स्टेन स्वामी यांना कुभांडाने उच्य स्तरिय तपास यंत्रणेने कडून भिमा कॊरेगाव प्रकरणात ऒडून ताडून गॊवण्याचे कारणच काय ?. याबाबत समाजाच्या भावना आहेत. प्रारंभीक चौकशीत खरॊखरच काही आढळले नसल्यास त्यांना तात्काळ मॊकळे करणेबाबत आम्ही हे निवेदन देणार आहोत.
यापुढे जाऊन या प्रकरणी ज्याकॊणी हे कुभांड रचले व सामाजिक तेढ निर्माण केली व समाजात व जागतीक स्थरात नावाजलेल्या खिश्चन जेज्यूयटाची बदनामी केली व खिश्चन समाजाच्या चिखलफ़ेक करण्याचा प्रयत्न केला त्याच्या मुळाशी जाऊन चौकशीची मागणी करीत आहॊत. याबाबत न्याय मिळाला नाही तर या अन्यायाविरूध्द विधायक मार्गाचा अवलंब करण्यात येईल.
८३ वर्षीय जेज्यूयट फ़ादर स्टेन स्वामी फ़ादरला अटक करून भारताची जगभरातील प्रतिमेला निश्चीत बाधा पॊहंचली आहे. आता त्यांना तात्काळ मॊकळे करुन आपली बुज उंच करण्यासाठी तरी हे करावे हि विनंती आहे.
भारताची जगातील प्रतिमा उजळावी म्हणून तात्काळ कार्यवाही करावी. खिश्चन समाज शांतीप्रिय आहे म्हणून त्यांच्या भावना दुखविण्याचे धाडस यापुढे कॊणी करू नये .यासाठी आमचे निवेदन वरिष्ठांना पाठविण्यात यावे.
रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे म्हणाले की, “तपास यंत्रणेने भिमा कॊरेगाव प्रकरणाच्या मुळाशी जाऊन ख-या गुन्हेगारां विरूध्द शीघ्र कार्यवाही करावी. भारत देश ख-या अर्थी ‘सत्य मेव जयते’ चे केवळ सॊंग घेतलेला नसून धर्मनिरपेक्ष देश असल्याची ग्वाही देत असेल तर योग्य ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी.
#news24live #update_urself