*वैद्या नानल रिसर्च फाऊंडेशन व सर्वाधिकार पत्रकार संघ यांच्यातर्फे पत्रकार बांधवांना दिवाळी फराळ व भेटवस्तूंचे वाटप*

 

पुणे (प्रशांत निकम) : वैद्य नानल रिसर्च फाऊंडेशन व सर्वाधिकार पत्रकार संघ यांच्यातर्फे पत्रकार बांधवांना दिवाळी फराळ व भेटवस्तू वाटप करण्यात आल्या. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब लडकत संघाच्या कांचन बडवणे, संघटक सिमोन सातपुते, सल्लागार संकेत खरपुडे आणि पत्रकार बांधव उपस्थित होते.

या कार्यक्रमामध्ये संजय शिंदे यांना पर्वती अध्यक्ष तर श्रीकांत बुरली यांना मुंबई संघटक या पदावर नियुक्त करण्यात आले.

यावेळी बोलताना बाळासाहेब लडकत यांनी नवनियुक्त सभासदांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व सर्व पत्रकारांना चांगले काम करण्यास मार्गदर्शन केले व दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

अध्यक्ष कांचन बडवणे यांनी पुढील ध्येय धोरणाबद्दल तसेच पत्रकारांच्या प्रश्नांबाबत, शिष्यवृत्ती बाबत, घरकुल योजनेबाबत, विविध प्रश्नांबद्दल संघ आवाज उठवणार असल्याचे सांगितले.

पुणे शहरातील प्रमुख घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करून चॅनेल करून बटन दाबा… 

https://www.youtube.com/channel/UCrG135hlRCpEP3vIfB9r5mg

सल्लागार संकेत खरपुडे म्हणाले की, आगामी काळातील विविध योजना, आरोग्‍य शिबीर, रक्तदान शिबीर, विविध प्रशिक्षण शिबिर याबद्दल माहिती दिली.

संघटक सिमोन सातपुते म्हणाले की, लवकरच पत्रकारांची नाव नोंदणी सुरू करण्याबाबत तसेच पत्रकार व माननीय पाहुणे यांचे आभार मानले तसेच पत्रकारांना दिवाळी शुभेच्छा दिल्या.

#24 #_