*ई-कार्डस प्राइवेट लिमिटेडचे इको-फ्रेंडली भारतीयकृत ऑनलाईन पोर्टल सुरू*

ई-कार्डस  प्राइवेट लिमिटेडचे इको-फ्रेंडली भारतीयाकृत ऑनलाईन पोर्टल सुरू 

जगातील सर्वोत्तम डिजिटल आणि पारंपारिक व्हिडिओ इनव्हीटेशन्स  
news24live.in : निमंत्रण पाठविण्याचा एकमेव स्त्रोत म्हणजे निमंत्रण पत्रके छापून निमंत्रण पाठविणे पण आता ह्या प्रवृत्तीमध्ये थोडा बदल होत आहे व निमंत्रण पत्रकांची जागा ई-कार्डस घेत आहेत. जागतिक पर्यावरण दिन म्हणजेच 5 जून रोजी www.ecardsindia.com ह्या ऑनलाईन निमंत्रण पोर्टलचे उद्घाटण झाले. ललित अगरवाल (संस्थापक ,अध्यक्ष), नवीन बिंदल (ऑपरेशनल अॅडव्हायझरी), अनुज अग्रवाल (मुख्य कार्यकारी अधिकारी), रत्नेश कुमार (सीटीओ) आणि रितेश जैन (वित्तीय सल्लागार) यांनी  पुण्यात आज आयोजीत एक पत्रकार परिषदेत ह्या पोर्टलचे उद्घाटण केले.

 भारतात होणार्या लग्नसमारंभासाठी भविष्यात ई-कार्डस खुप उपयोगी ठरतील. भारतीय बाजारपेठेची गरज ओळखुण आणि भारतात होणार्या लाखों विवाह सोहळ्यांच्या विशिष्ट गरजांची पूर्तता ह्या ऑनलाइन पोर्टलमुळे अधिक सुलभ होईल. येथे निमंत्रण  पाठविण्याची पद्धत्ती नवीन आणि आकर्षक आहे.  ग्राफिक्स, संगीत आणि व्हिडियोजच्या मदतीने विवाहासारख्या व अन्य कोणत्याही खास निमंत्रण अधिक रोचक बनेल.  
ह्या प्रसंगी आपले विचार व्यक्त करताना ललित अगरवाल (संस्थापक ,अध्यक्ष) म्हणाले की, ई-कार्डस  प्राइवेट लिमिटेडचा मुद्रित निमंत्रण पत्रक बनविण्याचा वासरा दोन दशकांहून अधिक आहे. भारतीय संस्कृतीची आणि सर्जनशीलतेची उत्तम सांगड कंपनीच्या कार्यातुन दिसून येते. परंपरा आणि तंत्रज्ञानाचा समतोल साधुन नवनिर्मिती करणे हे आमचे ध्येय आहे.आणि हिच गोष्ट आम्ही आता www.ecardsindia.com द्वारे घेऊन आले आहेत. ईकार्डस इंडिया डॉटकॉम आपल्या ग्राहकांना सानुकूलित पर्याय उपलब्ध करून देत वेळेची बचत करतो,आणि पर्यायाने पर्यावरणाचे संवर्धण करतो. अनुकूल उत्पादनांद्वारे बाजारपेठेत इको फ्रेंडली बदल घ़डून आणणे आमचा उद्येश्य आहे. 
भारतात निमंत्रण पत्रकांची किमंत साधारण ४० ते ५० हाजारापर्यंत असते. डिजाईन, प्रिटींग  आणि अन्य गोष्टींसाठी साधारण १ ते ३ आठवड्यांचा कालावधी लागतो. परंतु ई-कार्डस इंडिया डॉटकॉम वरती तुम्ही डिजाईनिंग बरोबरच संगीत, व्हिडियोज आणि अन्य गोष्टी साधारण दिड ते दोन हाजारत करू शकता.  हे कार्ड वॉट्सअप , ई-मेल आणि अन्य सोशल मीडिया वर शेयर करू शकता. आणि हे सर्व केवळ ३ ते ४ तासात होते. ई-कार्डस मुळे वेळ, मेहनत आणि पैश्यांची बचत होते. स्वताहा जाऊन कार्ड देण्यापेक्षा आपल्या प्रियजनांना अॉनलाईन निमंत्रणपत्र पाठविणे अधिक सुलभ होते.  
अनुज अग्रवाल (मुख्य कार्यकारी अधिकारी) म्हणाले की, 

ईकार्डस इंडिया डॉटकॉम चे उद्घाटण करने हा आमच्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. ह्या व्यवसायास अधिक उच्च पातळीवर घेऊन जाऊ असा आमचा ठाम विश्वास आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने भविष्यात ई-कार्डसचा वापर निश्चीत वाढेल. 

भारत असा एकमेव देश आह जेथे निमंत्रण पत्र उत्पादनासाठी एक संघटित बाजारपेठ आहे. विवाह निमंत्रण कार्डची गरज आयुष्यात एकदाच असते. आज अनेक निमंत्रण पत्र  वितरकांच्या दुकानात किंवा शोरुममध्ये कार्डची  किमंत अत्यंत महाग असते. आश्या प्रकारचे कार्ड बनवणारे ९० टक्टे रजिस्टर डिलर पुण्यासारख्या ट्रेडिंग हब मध्ये आणि शहरातील प्रमुख ठिकाण आसतात.  भारतात दरवर्षी सुमारे ५ लाख विवाह होतात. आणि ही संख्या मल्टी पल्समध्ये वाढत आहे कारण जगातील एकूण लोकसंख्येपैकी 6% लोक भारतीय तरुण आहेत ज्यांना पुढील 10 ते 15 वर्षांत लग्न होईल.