*डिजीकोरच्या वर्च्युअल टेलीपोर्टेशनद्वारे अन्य स्थानावरील गोष्टींचा मागोवा घेणे झाले सोपे.*

डिजीकोरच्या वर्च्युअल टेलीपोर्टेशनद्वारे अन्य स्थानावरील गोष्टींचा मागोवा घेणे झाले सोपे. 

आभासी कौशल्य विकास केंद्रे तयार करणारे डिजीकोर स्टुडिओ

news24live.in : डिजीकोर स्टूडियो प्रा.ली ह्या पुणेस्थित कंपनीने आपल्या  वर्च्युअल टेलीपोर्टेशनचे अनावरण केले आहे ज्यामध्ये कोणत्याही  दुसर्या स्थानावरील वरील वस्तु अथवा व्यक्तीस समोर टेलीपोर्टिंग करता येणे सहज शक्य झाले आहे. 

 

डिजीकोर स्टुडिओच्या सीईओ अभिषेक मोरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना सांगितले की,डिजीकोर तंत्रज्ञानाद्वारे वापरकर्त्यांना विशेष ट्रॅकिंग कॅमेर्याद्वारे मागोवा घेता येतो शक्य झाले आहे, ह्यात एचटीसी किंवा विशेष मशिन दिले जातात जे  वेगवेगळ्या ठिकाणी  वर्च्युअल टेलिपॉल्टेड व्हायला मदत करतात, या  तंत्रज्ञानामुळे  रियल इस्टेट डेव्हलपर्सला  वर्च्युअल  अपार्टमेंटस् तयार करण्यास मदत मिळेल, ह्या नवीन तंत्रज्ञानासाठी आम्ही खरोखरच उत्साही आहोत. 

आतिथीनां आपले  कॉर्पोरेट ऑफिस उत्पादने अश्या बर्याच गोष्टी  वर्च्युअल टेलीपोर्टेशनच्या माध्यमातुन दाखवणे आता सोपे झाले आहे, ह्या गोष्टी जनुकाही समोरच घडत आहेत इतक्या स्पष्टपणे समोरच्यास दाखविता येतात. 

शाळा, महाविद्यालय, फॅक्टरीज, ऑपरेशन थियेटर्ससाठी,  ही सुविधा खुपच  फायदेशीरपणे आहे. कोठेही न जाता बर्याच गोष्टींचा प्रत्यक्ष अनुभव, वातावरणचा प्रत्यक्ष अनुभव एका सेवा केंद्रावरूण विद्यार्थ्यी घेऊ शकतात, आणि अन्य बर्याच गोष्टी देखील ते शिकू शकतात, 

उदाहरणार्थ: पुण्यातील एक आर्किटेक्टचे कार्यालय आणि सिंगापूरमधील कार्यालय ह्या यंत्रणेद्वारे एकत्रितपणे टेलिपोर्टिंगच्या माध्यमातुन काम करू शकतात. 

डिजीकोर ह्या अद्वितीय वैशिष्ट्यांनी समृद्ध तंत्रज्ञानच्या मदतीने एसी दुरुस्ती, कार दुरुस्ती, २ व्हीलर दुरूस्ती, मशीन दुरूस्ती इत्यादिसारख्या कौशल्यांसाठी लोकांना प्रशिक्षित करण्याची कौशल्य विकास केंद्रे उघडणे अधिक सोपे झाले आहे. यामुळे भारतातील कौशल्य विकासाला चालना मिळेल.
डिजीकोर स्टुडिओ भारतात वर्च्युअल रिअॅलिटी गेमिंगमध्ये अग्रस्थानी आहे, आणि पुढच्या 2 वर्षांत संपूर्ण भारतातील 100 वर्च्युअल रिअॅलिटी गेमिंग सेंटर्स उभारण्याची योजना आहे. “व्हर्च्युअल गेमरूम” या ब्रॅण्ड अंतर्गत कार्यरत, पुण्यातील एफसी रोडवर आधीच 1 केंद्र कार्यान्वित आहे आणि भारतातील विविध शहरांमधून संभाव्य फ्रॅंचायझींचे 20 हून अधिक अर्ज आहेत.
डिजीकोरचा असा विश्वास  आहे की त्यांचे हे तंत्रज्ञान कंपन्या, शाळा आणि महाविद्यालये, रिअल इस्टेट डेव्हलपर्स, पर्यटन, संरक्षण इत्यादी क्षेत्रांसाठी प्रचंड लाभदायी ठरेल. डिजीकोर भारतात आपल्या वितरकांचे एक  व्यापक नेटवर्क तयार करीत आहे आणि डिसेंबर 2017 पर्यंत भारतभर या तंत्रज्ञानसाठी 50 वितरक योजना राबविल्या जातील. 
कंपन्या आणि शैक्षणिक संस्थांना  वर्च्युअल   टेलीपोर्टेशन अफाट लाभ कसा होईल हे डिजीकोर द्वारे पाहीले जात आहे.