*भारताचे 14 वे राष्ट्रपती रामनाथ कोविंद …पूर्ण माहिती वाचा*

रामनाथ कोविंद भारताचे नवे राष्ट्रपती; मीराकुमार पराभूत

news24live.in : राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद देशाचे १४ वे राष्ट्रपती ठरले आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत कोविंद यांनी तब्बल ६५.६५ टक्के मते मिळवून संयुक्त पुरोगामी आघाडीच्या उमेदवार मीराकुमार यांचा पराभव केला आहे. मीराकुमार यांना ३५.४३ टक्के मते मिळाली. दरम्यान, २५ जुलै रोजी कोविंद हे राष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारणार आहेत.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी १७ जुलै रोजी मतदान झाले होते. यावेळी ९९ टक्के इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली होती. आज सकाळी ११ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आणि पहिल्या फेरीपासूनच अपेक्षेप्रमाणे कोविंद यांनी मोठी आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत वाढत गेली आणि विक्रमी मताधिक्क्याने कोविंद यांनी विजय मिळवला.

कोविंद यांना ७ लाख २ हजार ६४४ तर मीराकुमार यांना ३ लाख ६७ हजार ३१४ मते मिळाली आहेत.