*प्रेमकथेसोबत समर्पणाची हृदयस्पर्शी किनार लाभलेला ‘आरती’ हा सिनेमा १८ ऑगस्टला*:व्हिडिओ

news24live.in : मराठी सिनेमा हा नेहमीच त्याच्या संहितेसाठी ओळखला जातो. उत्तम संहितेमुळे अनेक सिनेमे आजवर लक्षवेधी ठरले आहेत. सारा क्रिएशन आणि मिनीम फाऊंडेशनची प्रस्तुती असलेल्याआरती-अननोन लव्हस्टोरी या सिनेमातूनही मानवी मूल्य जपणारी वास्तवदर्शी प्रेमकथा पहायला मिळणार आहे. प्रेमाची परिभाषा प्रत्येकासाठी वेगळी असते. प्रेमकथेसोबत  समर्पणाची अत्यंत हृदयस्पर्शी अशी किनार या सिनेमाला लाभली आहे. वास्तवात घडलेली ही अनोखी प्रेमकहाणी जगासमोर आणण्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान या चित्रपटामागे उभ्या राहिल्या आहेत. या चित्रपटाची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन सारिका मेणे यांनी केलं आहे. १८ ऑगस्टला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

👉🏻 *बघा पूर्ण बातमी…*👇🏻
*आणि शेअर करा…*
💥 *MUST WATCH VIDEO n SHARE with ur friends…*


news24live.in
#update_urself
Don’t forget to *SUBSCRIBE* our CHANNEL on YouTube…
🌹🌻💐💥🌹🌻💐