Featured Video Play Icon

वन मालाज हॉटेलच्या दुसऱ्या वर्धापनदिनाचे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजन संपन्न…

इस खबर को सुनें
विवेककुमार तायडे यांचे कडून

पुणे, प्रतिनिधी : – वन मालाज हॉटेलच्या दुसऱ्या वर्धापनदिनाचे आयोजन पुण्यातील गोयल गंगा येथील खाऊ गल्ली येथे नुकतेच करण्यात आले होते. या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर,अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष स्वाती पोकळे,मालाज हॉटेलच्या संचलिका व राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस वनमाला बागुल व संदीप शिंदे, चित्रसेन भवार,आसावरी तारे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. या वन मालाज हॉटेलमध्ये अस्सल गावरान काळा मसाला चिकन, काळा मसाला बोकडाचे मटण, फिश थाळी, व्हेज थाळी, बेंगण भरीत असा लज्जत दार जेवणाचा आस्वाद पुणेकर खवय्यांना मिळणार आहे. पुणेकर खवय्यांना वेगळ्या प्रकारची चव चाखायची असेल तर नक्की एकदा वन मालाज हॉटेलला भेट द्या.

#news24live #update_urself

🟠🟡🟢🔵