📲 सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लॉंच, मिळणार फक्त ‘एवढ्या’ रुपयांत…

इस खबर को सुनें
Vivekkumar Tayade

पुणे : 📳 भारतातील स्मार्टफोन निर्माता कंपनी ‘लाव्हा’ ने आपला नवीन 5G फोन Lava Blaze 5G नुकताच लॉंच केला आहे. हा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत विकला जाणार असल्याची माहीती आहे. लाव्हाचा हा 5G स्मार्टफोन देशातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असल्याचं म्हटलं जात आहे.

📶 लाव्हा ब्लेझ 5G स्मार्टफोन सर्वात प्रथम ऑगस्ट 2022 मध्ये नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये पाहिला गेला. हा फोन 9,999 रुपयांच्या किंमतीस लॉंच झाला आहे. यानंतर ओनलाईन किंवा ऑफलाईन खरेदी करताना किंमतीत किंचित बदल होऊ शकतो. तरीही हा भारतातील सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन असणार आहे.

🤟 लाव्हा ब्लेझ 5G चे आकर्षक फीचर्स:

1) डिस्प्ले:
▪️ स्मार्टफोनमध्ये 6.51-इंचाचा HD+ डिस्प्ले
▪️ डिस्प्लेचे रिझोल्यूशन 720×1600 पिक्सेल
▪️ फोनच्या डिस्प्लेसोबत 2.5D वक्र ग्लास उपलब्ध
▪️ डिस्प्लेचा रिफ्रेश रेट 90Hz असणार

2) प्रोसेसर: स्मार्टफोनमध्ये प्रोसेसर एकदम जबरदस्त असून तो मीडियाटेक डायमेंसिटी 700 असेल. फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमवर चालणार आहे.

3) स्टोरेज व कॅमेरा: स्टोरेजबद्दल बोलायचं झालं तर 3 GB रॅमसोबत 4 GB रॅम मिळणार आहे. तर स्टोरेज 128 GB असणार आहे. कॅमेरा 50 एमपी चा एआय ट्रिपल कॅमेरा असणार आहे. स्मार्टफोनमध्ये 5000 एमएएच ची दमदार बॅटरी मिळणार आहे.

4) स्मार्टफोनमध्ये यूएसबी टाईप-सी पोर्ट आणि प्रायव्हसी साठी पॅटर्न, पासवर्ड फिचरशिवाय साइड-माउंट फिंगरप्रिंट सेन्सर देखील असणार आहे.

5) कनेक्टिव्हिटीसाठी पाच 5G बँड शिवाय फोन 4G व्होल्ट, ड्युअल-बँड वाय-फाय आणि ब्लूटूथ v5.1 ला सपोर्ट करणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖

#news24live #update_urself #lavablaze5G #chipestsmartphone #lavasmartphone