🏏 हार्दिक पंड्या होणार कॅप्टन..? टीम इंडियाबाबत मोठी बातमी…

इस खबर को सुनें

मुंबई, प्रतिनिधि : 🏆 टी-20 वर्ल्डकप मधून सेमीफायनल मध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियाबाबत अनेक घडामोडी समोर येत आहेत. इंग्लंडने पराभव केल्यानंतर रोहित शर्माच्या डोळ्यात अश्रू आल्याचे दिसले. प्रशिक्षक राहुल द्रविडशी चर्चादेखील करत असतानाचा व्हिडीओ त्याचा व्हायरल झाला आहे. आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

🥎 भारतीय क्रिकेट संघ टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतून बाहेर पडला असून हार्दिक पंड्याला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. कारण भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 3 टी-20 सामने व 3 वनडे सामने येत्या काही दिवसांत खेळणार आहे. या सामन्यांसाठी भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्याकडे देण्यात येणार आहे. म्हणजे हार्दिक पंड्या आगामी काही सामन्यांत भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन राहू शकतो.

🧢 तसेच, टी-20 वर्ल्डकपमध्ये फॉर्ममध्ये परतल्यानंतर धावांचा पाऊस पाडणारा फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी पुढील काही सामन्यांत विश्रांती देण्यात येणार आहे. याशिवाय प्रशिक्षक राहुल द्रविड यांना विश्रांती देण्यात येणार असून त्या जागी माजी खेळाडू व्ही.व्ही. एस. लक्ष्मण संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत, अशी माहीती आहे.

🤘 हार्दिक पंड्याने मोडला युवराज सिंहचा विक्रम :

भारतासाठी इंग्लंडविरुद्ध अखेरच्या षटकांत धुलाई करत अर्धशतक करून अष्टपैलू हार्दिक पंड्याने टी-20 विश्वचषकात 5 किंवा यानंतरच्या नंबरवर येणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये सर्वाधिक धावा करत 1 नंबरवर पोहोचला आहे.

▪️ 63 – हार्दिक पंड्या विरुद्ध इंग्लंड (2022)

▪️ 58 – युवराज सिंग विरुद्ध इंग्लंड (2007)

▪️ 50 – रोहित शर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2007)

▪️ 45 – एमएस धोनी विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2007)

▪️ 45 – सुरेश रैना विरुद्ध दक्षिण आफ्रिका (2012)

➖➖➖➖➖➖➖➖➖

#news24live #update_urself