निरोगी आरोग्यासाठी धावणे काळाची गरज…
क्रांतीगुरू लहुजी दौड रॅलीमध्ये धावले शेकडो स्पर्धक…
क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या 228 व्या जयंतीनिमित्त क्रांती गुरू लहुजी वस्ताद जयंती महोत्सव समिती,पुणे तर्फे क्रांतीगुरू लहुजी दौड रॅलीस उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे, (विवेककुमार तायडे यांचे कडून) – क्रांतीगुरू लहुजी वस्ताद जयंती महोत्सव समिती,पुणे तर्फे लहुजी वस्ताद साळवे यांच्या 228 व्या जयंतीनिमित्त क्रांतीगुरू लहुजी दौडचे पुण्यात करण्यात आले होते. लहुजी दौड रॅलीचे उद्घाटन पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार दिलीप कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले. पुण्यातील स्वारगेट येथील लोकशाहीर अण्णाभाऊ पुतळा ते संगमवाडी पुलावरील क्रांतीगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस्थळापर्यंत लहुजी दौड रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
या रॅलीच्या समारोप प्रसंगी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पुणे कॅन्टोन्मेंटचे आमदार सुनील कांबळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महेश कर्पे,भूपेंद्र मुजुमदार,अशोक लोखंडे, माजी नगरसेवक आनंद रिठे, माजी नगरसेविका स्वाती लोखंडे, रॅलीचे आयोजक क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे महोत्सव समिती चे सुनील खंडाळे, सुनील दुबळे,डॉ. सुनील भंडगे, मुकुंद माने विशाल उमाप,सुखदेव अडागळे, निखिल आल्हाट, छगन बुलाखे, सनी घोडे, शरद शिंदे,विकास सातारकर, किरण क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
या रॅलीमध्ये द महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्था, क्रीडा भारती या संस्था सहभागी झाल्या होत्या. या रॅलीमध्ये 450 ते 500 युवक युवती व स्वयंसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या क्रांतीगुरु लहुजी दौड रॅलीस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.
#news24live #update_urself
🟠🟡🟢🔵
