पुणे, (विवेककुमार तायडे यांचे कडून) -जे फॉर इ संस्थेतर्फे वार्षिक नेटवर्किंग बैठकीचे आयोजन पुण्यात टीप टॉप इंटरनॅशनल हॉटेलमध्ये करण्यात आले होते. या परिषदेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, केंद्र सरकारच्या एमएसएमई चे प्रियब्रता प्रामाणिक, रुबी हॉल क्लिनिकचे मॅनेजिंग ट्रस्टी व चेअरमन परवेज ग्रँट उपस्थित होते या प्रसंगी जे फॉर यु च्या ब्रँड अँबेसिडर रत्नावली इंगळे, जे फॉर यू चे संस्थापक अध्यक्ष विशाल मेठी, येवले अमृततुल्यचे संचालक नवनाथ येवले, पुना गेस्ट हाऊस चे किशोर सरपोतदार आदी मान्यवर उपस्थित होते. या वार्षिक नेटवर्किंग बैठकीमध्ये 400 पेक्षा जास्त नवउद्योजकांनी सहभाग घेतला.
वार्षिक बैठकीमध्ये उद्योग कसा वाढवावा याविषयी प्रियव्रता प्रामाणिक यांनी व्याख्यान दिले. या बैठकीमध्ये हॉटेल, बांधकाम,वैद्यकीय, फॅशन, फोटोग्राफी, मार्केटिंग आधी विविध क्षेत्रातील नवउद्योजकांनी सहभाग घेतला.या बैठकीमध्ये विविध क्षेत्रातील उद्योजकांनी आपल्या व्यवसाय संदर्भात विविध उद्योजकांशी चर्चा केली.
#news24live #update_urself
🔵🟢🟡🟠🔵🟢
