Featured Video Play Icon

नेतृत्वकौशल्य व वक्तृत्वकौशल्य वाढविण्यासाठी टोस्टमास्टर्स इंटरनॅशनल मध्ये सहभाग नोंदवावा – मयांक नायडू

इस खबर को सुनें

पुणे -सद्यस्थितीत क्षेत्र कोणतंही असलं तरी आजमितीला नेतृत्व व वक्तृत्व कौशल्याची गरज असून प्रत्येकाला करियर करण्यासाठी आवश्यक आहे

18 ते 75 पेक्षा जास्त वयोगटातील लोकांना ते मिळावं यासाठी टोस्टमास्टर्स इंटरनॅशनल मध्ये सहभाग नोंदवावा अशी माहिती पत्रकार परिषदेत डिस्ट्रिक्ट 125 पब्लिक रिलेशन मॅनेजर मयांक नायडू यांनी दिली.

टोस्टमास्टर्स इंटरनॅशनल ही कोणत्याही पद्धतीचा नफा कमवण्याच्या उद्देशाने काम करीत नसून सद्यस्थितीत 145 देशात असून 2 लाख 80 हजार सक्रिय सदस्य आहेत

1924 ला स्थापना झालेली टोस्टमास्टर्स इंटरनॅशनलला 98 वर्षे पूर्ण झाले आहेत

जागतिक स्तरावर पुनर्स्थापना झाल्यानंतर पुणे ,गोवा, अहमदनगर,औरंगाबाद, कोल्हापूर ,नाशिक येथे नवीन क्लब करण्यास सुरुवात झाली आहे अशी देखील माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

यावेळी पत्रकार परिषदेला डिस्ट्रिक्ट 125 डायरेक्टर सीमा राणी , डिस्ट्रिक्ट 125 पब्लिक रिलेशन मॅनेजर मयांक नायडू, डिस्ट्रिक्ट 125 प्रोग्राम क्वालिटी डायरेक्टर संजुक्ता कुंदु ,डिस्ट्रिक्ट 125 फायनान्स मॅनेजर संकेत सराफ व डिस्ट्रिक्ट 125 अडमिनिस्ट्रेशन मॅनेजर जयेशकुमार पिंडोरिया उपस्थित होते

टोस्टमास्टर्स इंटरनॅशनल मध्ये सहभाग नोंदविण्यासाठी पॅथवेज एज्युकेशन प्रोग्राम ऑनलाईन उपलब्ध आहेत

तसेच संपर्क साधण्यासाठी

www.toastmasters.org,

District 125

या वेबसाईटवर साधावा…

@news24live.in #update_urself