सर्वात लोकप्रिय खेळ क्रिकेट द्वारे रस्ता सुरक्षा आणि खबरदारीविषयी जनजागृती
पुणे -दिवंगत सायरस मिस्त्री, जे एक भारतीय उद्योगपती आणि टाटा समूहाचे माजी अध्यक्ष होते, यांच्या अपघाती निधनानंतर, रस्ते अपघात आणि सुरक्षिततेबाबत ठोस पाऊल उचलण्याची गरज ओळखून शासनाची मान्यताप्राप्त संस्था बोर्ड फॉर वेटरन क्रिकेट इन इंडिया, (क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालय, नवी दिल्ली) यांच्या तर्फे भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ क्रिकेट द्वारे रस्ता सुरक्षा आणि खबरदारीविषयी जनजागृती तसेच सामाजिक संदेश देणारा ‘रस्ता सुरक्षा क्रिकेट चषक’ हा एक दिवसीय उपक्रम येत्या ११ डिसेंबर रोजी शिवाजी नगर पोलिस ग्राउंड येथे संस्थेचे मुख्य अध्यक्ष श्री. नितीन गडकरी यांच्या पाठिंब्याने आणि मार्गदर्शनांतर्गत आयोजित करण्यात आल्याची घोषणा संस्थेचे युवा अध्यक्ष मिहिर कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत केली.
पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे महानगर पालिका आयुक्त विक्रम कुमार, पुण्याचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त राहुल चव्हाण यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्ता सुरक्षा क्रिकेट चषक मधे उत्स्फुर्त सहभाग घेतला आहे. येत्या ११ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० ते दुपारी १२.३० दरम्यान रेगिन्ग लायन्स (पुणे पोलिस) आणि स्काय हॉक्स (पुणे, मनपा) या दोन संघा मधे क्रिकेट सामना रंगणार असून जनतेस पाहण्यास खुला असणार असल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले.
@news24live #news24live #update_urself
