Featured Video Play Icon

इस खबर को सुनें

फॅशन शो ची ग्रुमिंग फेरी उत्साहात संपन्न

पूणे, news24live.in – मयुरा इव्हेनमेंट यांच्यातर्फे आयोजित व मानिनी मानव सेवा ट्रस्ट , मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट , डिजिटल पुणेकर यांच्या सहकार्याने मिस्टर मिस मिसेस व किड्ससाठी गेम ऑफ क्राउन्स – अ कल्चरल फॅशन शोचे आयोजन 22 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5 वाजता पुण्यातील सातारा रस्त्यावरील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे सभागृह येथे होणार आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले व वास्तु विशारद तज्ञ आनंद पिंपळकर उपस्थित राहणार आहेत. या फॅशन शो साठी ग्रुमिंग राऊंड अण्णाभाऊ साठे सभागृह येथे घेण्यात आला होता. या ग्रुमिंग साठी परीक्षक म्हणून अभिनेते व दिग्दर्शक प्रवीण लाड, मॉडेल श्रेया वर्मा, मॉडेल दिवीजा शर्मा, डान्स कोरिओग्राफर उपासना शिंदे, अभिनेते प्रणव पिंपळकर, अभिनेते हर्षल मराठे,आहार तज्ञ सलोनी घुगे, फॅशन मॉडेल गायत्री ठाकूर परीक्षण करणार आहेत.

या कार्यक्रमाचे आयोजन मयुरा इन्व्हेंटचे मयूर डहाके, मानिनी मानव सेवा ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता पिंगळे, मानव सेवा ट्रस्टचे अध्यक्ष अल्ताफ पिरजादे आदींनी केले आहे.

@news24live #news24live #update_urself