दोन दिवसीय भव्य वरद प्रॉपर्टी फेस्टिवल चे दिमाखदार उद्घाटन

इस खबर को सुनें

पुणे : वरद प्रोपर्टी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड तर्फे पुण्यातील पंडित फार्म व बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे सकाळी दहा ते आठ या वेळेत दोन दिवसांचे वरद प्रॉपर्टी फेस्टिवल 2023चे आयोजन करण्यात आले असून आज (शनिवार) कोथरूडच्या माजी आमदार व भाजप राष्ट्रीय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते पंडित फार्म येथे फेस्टिवल चे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी वरद प्रॉपर्टी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक व वरद प्रॉपर्टी फेस्टिव्हलचे आयोजक महेश कुंटे, अपर्णा कुंटे, विजय कुंटे उपस्थित होते. हा महोत्सव म्हणजे पुण्यात फ्लॅट अथवा जमीन खरेदी करण्यास इच्छूक ग्राहकांसाठी एक पर्वणी असून २०० पेक्षा जास्त रेसिडेन्सीयल व कमर्शियल प्रोजेक्ट या वरद प्रॉपर्टी फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाले आहेत. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी, रविवारी सकाळी ११ वा. आजची आघाडीची अभिनेत्री सई ताम्हणकर महोत्सवास भेट देणार आहे.

वेगाने विस्तारणाऱ्या पुणे जिल्हयाच्या सर्वांगीण प्रगतीत गृहनिर्माण क्षेत्राचे योगदान मोठे आहे. त्यामुळेच गृहनिर्माण क्षेत्राची पुढील वाटचाल, आव्हानं, दिशा याबद्दल चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून ‘महाराष्ट्राचा महासंकल्प, पुणे रिअल इस्टेट काँक्लेव” हा परिसंवाद उद्या, रविवार, दुपारी २ ते सायं.६ या वेळेत पंडित फार्म येथे आयोजित करण्यात आला असून महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुण्याचे पालक मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार दिलीप मोहिते पाटील, आमदार, रवींद्र धंगेकर, आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप, माजी आमदार व भाजप राष्ट्रिय महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा मेधा कुलकर्णी, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, नगरसेवक वसंत मोरे, क्रेडाई, पुणे चे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, नरेडको माहि व्यवस्थापकीय संचालक, एमएसपीएल ग्रुप च्या उपाध्यक्षा, स्मिता पाटील, ख्यातनाम वकील आणि सामाजिक कार्यकर्ते ॲड. मकरंद आडकर, पिनाक कन्सल्टिंग प्रा. लि. चे संचालक दिनेश वसंत चंद्रात्रे आणि आयोजक महेश कुंटे या मधे सहभागी होणार आहेत.

“सर्व गृहनिर्माण क्षेत्रातील व्यावसायिकांना आम्ही महोत्सवात विनामूल्य सहभागी करून घेतो. या वेळी महोत्सवात फक्त गृह खरेदी हा विषय न ठेवता सध्या गृह निर्माण क्षेत्रात भेडसावणाऱ्या समस्यांवर एक परिसंवाद आयोजित करीत आहोत”.- वरद प्रॉपर्टी सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड चे संचालक व वरद प्रॉपर्टी फेस्टिव्हलचे आयोजक महेश कुंटे.

@news24live #update_urself