Pune, 4 June, 2023 :- मोतीबिंदूमुळे दृष्टी गमावण्या सारख्या गंभीर परिणामांबद्दल जागरूकता आणण्यासाठी दादा लेझर आय इन्स्टिट्यूटने “मोतीबिंदू-मुक्त पुणे वॉकथॉनचे आयोजन केले होते ज्याला अतिरिक्त पोलीस आयुक्त श्री. प्रवीण कुमार पाटील आणि डॉ. जीवन लाडी यांनी हिरवा झेंडा दाखवला .
दादा लेझर आय इन्स्टीट्यून ने रविवार, ४ जून २०२३ रोजी “मोतीबिंदू-मुक्त पुणे वॉकथॉन” (कॅटरॅक्ट फ्री पुणे वॉकेथॉन) चे आयोजन केले होते. या वॉकथॉनची सुरुवात सकाळी ७.३० वाजता साधू वासवानी रोडवरील साधू वासवानी पुतळ्यापासून झाली आणि गुलमोहर अपार्टमेंट, ईस्ट स्ट्रीट, कॅम्प, पुणे ४११००१ येथे असलेल्या दादा लेझर आय इन्स्टिट्यूट येथे या वॉकथॉनची समाप्ती झाली.
या औचित्यवर जनजागृती करण्यासाठी पुण्यातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते .मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणीमध्ये सहभागी होण्यासाठी, त्वरीत नोंदणीसाठी इच्छुक डीएलईआयच्या ९९२२९९५५४९ या क्रमांकावर कॉल करू शकतात.
#news24live #update_urself
