नवीन घर खरेदी करताय; तर ही आहे तुमच्या कामाची बातमी

इस खबर को सुनें

पुणे, news24live :- आता घर खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी अडकून पडलेले लाखो गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकार निधी देणाऱ्या त्यामुळं घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल.

अडकलेल्या घरबांधणी प्रकल्पामुळं घर खरीददारांची ससेहोलपट होते. अनेक घर खरेदीदारांना पैसे भरूनही घरे मिळालेली नाहीत. या लोकांना घर भाडे आणि घराच्या कर्जाचा हप्ता असा दुहेरी भुर्दंड सहन करावा लागत आहे.
अशा प्रकल्पांसाठी केंद्रानं अलीकडेच रिझर्व बँक आणि बँकांची बैठक घेतली अनेक बँकांनी अशा मालमत्तांवरील आपला पहिला हक्क सोडण्याची तयारी दर्शवीली आहे. त्यामुळे हे प्रकल्प नव्या विकासकांना हस्तांतरित करणे सुलभ होइल तसेच विकासकां दिलेल्या पैशांचीही वसुली होइल. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी स्वामीह 2 योजनेला आणखी निधी देण्याचा विचार सरकार करीत आहे. त्यासाठी हितधारक, बँक आणि नियामक यांच्याशी चर्चा करत आहेत.

4.80 लाख गृहनिर्माण प्रकल्प बांधकामांच्या वेगवेगळ्याटप्प्यात अडकून पडलेत तर 4.48 लाख कोटी रुपये या प्रकल्पात अडकलेत यातील 77 टक्के प्रकल्प दिल्ली एनसीआर आणि मुंबई मधील आहेत.तर एकूणच कुठे किती प्रकल्प अडकले आहेत. जाणून घेऊयात

दिल्ली-एनसीआर 2 लाख 40 हजार 610

मुंबई महानगर क्षेत्र
1 लाख 28 हजार 870

पुणे
44 हजार 250

बंगळुरू
26 हजार 30

कोलकाता
23 हजार 540

हैदराबाद
11 हजार 450

चेन्नई
5 हजार 190

अडकलेल्या प्रकल्पांसाठी केंद्र सरकार निधी देणार असल्यामुळं घर खरेदी करणाऱ्यांना सरकारकडून दिलासा मिळालाय.

#news24live #update_urself